Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या बैठकीत ४ महत्त्वाचे ठराव मंजूर
पिंपरी चिंचवड

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या बैठकीत ४ महत्त्वाचे ठराव मंजूर

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 10, 2026Updated:May 10, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी (हिंदवी न्यूज)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची आढावा बैठक समितीचे सभापती कैलास कुटे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या बैठकीत शहरातील क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी चार महत्त्वाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. तसेच शहराच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक धोरणांवर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीस समिती सदस्य भाऊसाहेब भोईर, शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, योगेश लांडगे, जितेंद्र ननवरे तसेच उपआयुक्त पंकज पाटील आणि जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.  बैठकीत शहरातील नागरिक, खेळाडू, कलाकार आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी लोकाभिमुख प्रस्ताव सादर करण्यात आले. सभापती कैलास कुटे यांच्या पुढाकारातून मांडण्यात आलेल्या या प्रस्तावांद्वारे शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा उद्देश व्यक्त करण्यात आला.

नवीन कला व सांस्कृतिक केंद्रांची उभारणी शहरातील नवोदित कलाकार, विद्यार्थी व नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध भागांत ‘कला व सांस्कृतिक केंद्र’ सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या केंद्रांमधून चित्रकला, संगीत, नृत्य आणि नाट्य यांसारख्या कलांचे प्रशिक्षण दिले जाणार असून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यामुळे शहराच्या सांस्कृतिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

खेळाडूंसाठी अपघाती विमा संरक्षण महापालिकेमार्फत आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ‘अपघाती विमा संरक्षण’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक खेळाडू आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील असल्याने स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी विमा कवच उपयुक्त ठरणार आहे. तसेच विम्याचा प्रीमियम महापालिकेमार्फत भरण्याची सूचनाही करण्यात आली.

महिलांसाठी विशेष सवलती व सुविधा महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणाच्या दृष्टीने शहरातील जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि इतर क्रीडा सुविधांमध्ये विशेष सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला. मासिक व वार्षिक शुल्कात 50% सवलत तसेच महिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे महिलांचा क्रीडा आणि आरोग्यदायी उपक्रमांतील सहभाग वाढण्यास मदत होईल. क्रीडा विभागाचे नामकरण शहराच्या सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने क्रीडा विभागाचे ‘क्रीडा, कला, साहित्य, पर्यटन व सांस्कृतिक विभाग’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रीडा क्षेत्राबरोबरच कला, साहित्य, पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महापालिकेअंतर्गत पं. भीमसेन जोशी संगीत अकादमी (निगडी), सावित्रीबाई फुले अकादमी (वाकड), सार्वजनिक ग्रंथालये, स्पर्धा परीक्षा केंद्रे तसेच क्रांतिवीर चापेकर वाडा (चिंचवडगाव) यांसारख्या विविध संस्थांद्वारे सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्राला चालना दिली जात आहे. या सर्व उपक्रमांना एकत्रित व सुसूत्र दिशा देण्यासाठी एकात्मिक धोरण राबविण्याची गरज असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

—-

या बैठकीत मंजूर करण्यात आलेले ठराव शहराच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या निर्णयांमुळे शहरातील खेळाडू, कलाकार आणि नागरिकांना अधिक संधी व सुविधा उपलब्ध होतील. तसेच महिलांच्या सहभागात वाढ होऊन सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळेल. आगामी काळात या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पिंपरी चिंचवड शहराला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रस्थानी नेण्याचा आमचा प्रयत्न राहील,

– कैलास कुटे, सभापती , क्रीडा, कला व साहित्य समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल ९०.२४ टक्के
Next Article छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रबोधन पर्व उपयुक्त – महापौर रवि लांडगे
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज प्रस्तुत ‘नवदुर्गा’ मालिका हिंदवी न्यूज | पिंपरी : हिंदवी न्यूजच्या ‘नवदुर्गा’ या विशेष…

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?