Author: Hindavinewsnetwork@gmail.com

हिंदवी न्यूज | पिंपरी  महिलांनी स्वतःमधील दुर्गाशक्ती ओळखून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, स्वावलंबी बनावे आणि जीवनात प्रगती साधावी, असा प्रेरणादायी संदेश सौ उमाताई  गिरीश खापरे (आमदार, विधान परिषद महाराष्ट्र) यांनी महिलांना दिला. प्रत्येक महिलेच्या अंगी एक वेगळी शक्ती, क्षमता आणि कर्तृत्व दडलेले असते. महिलांनी स्वतःमधील ही शक्ती ओळखून आत्मविश्वासाने पुढे यावे. केवळ स्वतःची प्रगती करण्यापुरते मर्यादित न राहता इतर महिलांनाही पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महिलांनी शिक्षण, रोजगार, व्यवसाय तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा. स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर समाजात स्वतःचे स्थान निर्माण करावे. महिलांनी सक्षम होणे ही काळाची…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी  सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चार शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले .  यामध्ये संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची माध्यमिक आश्रम शाळा आष्टा, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, विलासराव शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टा, बी .के .चौगुले माध्यमिक विद्यालय आष्टा या शाळांचा समावेश होता . कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगली जिल्हा समन्वयक प्रा. एस. आर .पाटील यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालवयात मुलांना संस्कारमय व मूल्यशिक्षण देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले . ह भ प वाबळे महाराजांनी संस्काररूपी कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले . कार्यक्रमाचे प्रमुख…

Read More

हिंदवी न्यूज  | आळंदी  आळंदी येथील चाकण चौक श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ जवळील कॉर्नर शॉप किशोर भाऊ काशिनाथ मोझे यांचे चाकण चौक गोपाळपुरा रस्ता येथील दुकानाला रात्री दोनच्या सुमारास आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या मिराताई भोसले आणि चौकातील नागरिक व्यापारी, वाहतूक पोलिस यांनी तात्काळ अग्निशमन केंद्रास कळवून आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले. आगीत दुकानातील मालासह इतर साहित्य आगीत भस्म साथ झाले. यात दुकान मालकाचे खूप मोठी वित्त हानी होऊन नुकसान झाले. १० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ०२:४५ चे सुमारास आळंदी येथील चाकण चौक हेंद्रेवाडा येथील किराणा दुकानाचे…

Read More

हिंदवी न्यूज प्रस्तुत ‘नवदुर्गा’ मालिका हिंदवी न्यूज | पिंपरी : हिंदवी न्यूजच्या ‘नवदुर्गा’ या विशेष मालिकेच्या माध्यमातून सौ. मनीषा योगेश चिंचवडे यांनी नवरात्रीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच समाजातील महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून प्रगती करावी, कष्ट करण्याची तयारी ठेवावी आणि स्वावलंबी बनावे, असे आवाहन केले. महिलांनी शिक्षण, कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. प्रत्येक महिलेने स्वतःमधील क्षमता ओळखून आत्मविश्वासाने पुढे जावे. स्वावलंबनामुळे महिलांना स्वतःचे निर्णय घेण्याचे बळ मिळते आणि कुटुंबाच्या प्रगतीतही त्यांचे योगदान अधिक प्रभावी ठरते, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. “महिला सशक्त असेल, तर कुटुंब आणि राष्ट्र दोन्ही सशक्त होतील,” असे सांगत महिलांनी केवळ…

Read More

हिंदवी न्यूज | नवी सांगवी साई चौक येथील लोकनेते लक्ष्मण भाऊ भाजी मार्केट मध्ये आमदार शंकर भाऊ जगताप व नगरसेवक माऊली शेठ जगताप यांच्या मार्गदर्शनात दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या सह भाजी विक्रेते यांच्यावतीने नानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली देण्याात आली. 8 ऑक्टोबर रोजी गोवा येथे नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नाना पाटेकर यांचे खरे नाव विश्वनाथ गजानन पाटेकर हे होते. पण ते चित्रपट सृष्टीत नाना पाटेकर म्हणूनच प्रसिद्ध होते. नाना पाटेकर यांनी पाच दशक चित्रपट सृष्टीत भरीव योगदान दिले. चित्रपट सृष्टीत मानाचे मानले…

Read More

– मुळशीतील चार गावांमध्ये मोजणीच्या तारखा निश्चित; -हवेलीतील मांजरी खुर्द येथे दि. १३, तर कोलवडी येथे १५   ऑक्टोबरपासून मोजणी – बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची ‘पीएमआरडीए’ची    ग्वाही! हिंदवी न्यूज | पुणे  पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडीवर शाश्वत तोडगा काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या प्रस्तावित ‘इनर रिंग रोड’च्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळत आहे. मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यांतील विविध गावांमध्ये आयोजित मोजणीपूर्व ग्रामबैठकांना ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, मुळशीतील चार गावांमध्ये प्रत्यक्ष जमीन मोजणीच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत. हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथे दि. १३, तर कोलवडी येथे १५ ऑक्टोबरपासून मोजणी सुरू होणार आहे.…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी  प्रसिद्ध अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते कै.नाना पाटेकर यांचे आज दिनांक 8 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे दुःखद निधन झाले.  संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या नियोजीत बैठकी पूर्वी सायंकाळी 6.30 वाजता कै. नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, यावेळी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते  यशवंत भाऊ भोसले यांनी नानांच्या चाळीस वर्षाच्या चित्रपटांमधील विविध भूमिकांच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच “नाम” फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले सामाजिक कार्याची उपस्थिताना आठवण सांगितली. आम्ही पाहिलेल्या नानांच्या काही चित्रपटांपैकी 1979 साली प्रदर्शित झालेल्या सिंहासन चित्रपटांमध्ये नाना पाटेकर…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवडचे  पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal – PPM) प्रदान करून गौरविण्यात आले. शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये आयोजित पदक अलंकरण समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती महोदयांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी विनय कुमार चौबे यांना प्रशासकीय सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले होते. या घोषणेनंतर आयोजित पदक अलंकरण समारंभात त्यांना हे पदक बहाल करण्यात आले. विनय कुमार चौबे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय सेवेची…

Read More

पुणे : हिंदवी न्यूज स्वतःच्या घराचे स्वप्न साका(र करण्यासाठी कष्टाची कमाई गुंतवली. बांधकाम व्यावसायिकाने २०१२ मध्ये पैसे स्वीकारले; मात्र, सदनिकेचा नोंदणीकृत खरेदी करार करण्यासाठी तब्बल पाच वर्षे लावली. त्यानंतरही ग्राहकाच्या हाती घराची चावी पडलीच नाही. अखेर पुणे जिल्हा ग्राहक आयोगाने बांधकाम व्यावसायिकाला दणका देत ग्राहकाचे नऊ लाख चार हजार ५०० रुपये १२ टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले. याशिवाय मानसिक त्रासापोटी ३५ हजार रुपये आणि तक्रार खर्चापोटी १५ हजार रुपये देण्याचे आदेश आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरुण गायकवाड, सदस्या कांचन गंगाधरे आणि प्रणाली सावंत यांनी दिले आहेत. याप्रकरणी अनिता महिंद्र जवाजी यांनी डब्ल्यू. एस. डेव्हलपर्स प्रा. लि. तसेच योगेश वसंत शेलार…

Read More

हिंदवी न्यूज | आळंदी कै. आमोद पानसे यांच्या स्मरणार्थ श्रीमती शुभलक्ष्मी पानसे यांच्या देणगीतून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांच्या सहयोगाने भारत विकास परिषद कोथरूड शाखा व दिव्यांग केंद्र पुणे यांचे मार्फत मॉड्युलर पाय, हात व पोलिओ कॅलिपर मोफत मोजमाप शिबिर घेण्यात येणार आहे. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून जवळच असणाऱ्या पितळी गणपती मंदिरासमोर हराळे वैष्णव धर्मशाळेत दि. 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या शिबिरात मॉड्युलर पाय आणि हात व पोलिओ कॅलिपर बसविण्यात येईल, अशी माहिती आळंदी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. श्री ज्ञानेश्वर महाराजसंस्थानचे व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिव्यांग ट्रस्टचे अध्यक्ष दत्ताजी…

Read More