Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»शून्य कचरा संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड

शून्य कचरा संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाला चालना

पिंपरी, (हिंदवीन्यूज)- कचरा व्यवस्थापनात नागरिकांच्या सहभागातून सकारात्मक बदल घडत असल्याचे चित्र पिंपरी चिंचवड शहरात दिसून येत आहे. महापालिकेच्या शून्य कचरा संकलन (झिरो वेस्ट स्लम) उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या महिनाभरात ११.४७ टन कचऱ्याचे स्रोतस्तरावर विलगीकरण करण्यात आले आहे. या उपक्रमात १९ हजार ८०५ घरांनी सहभाग नोंदविला आहे.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, महिनाभरात कालावधीत ९.९७ टन ओला कचरा आणि १.५० टन सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यात आला. याशिवाय, ६४३ किलो सॅनिटरी कचऱ्याचे सुरक्षित पद्धतीने व्यवस्थापन करण्यात आले. कचऱ्याच्या वर्गीकरणामुळे पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती प्रक्रियेला गती मिळत असून, पर्यावरणीय परिणाम कमी करण्यास मदत होत आहे.

कचरा डेपोवरील वाढता ताण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी महापालिकेकडून शून्य कचरा संकल्पना राबविण्यात येत आहे. घराघरांत ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा वेगळा करण्याची सवय वाढत असल्याने कचऱ्याच्या वैज्ञानिक व्यवस्थापनाला बळ मिळत आहे.

याबाबत महापौर रवि लांडगे म्हणाले, शून्य कचरा संकलन उपक्रमाला मिळणारा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही पिंपरी चिंचवडकरांच्या पर्यावरणाप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष आहे. स्रोतस्तरावर कचऱ्याचे विलगीकरण केल्यास कचऱ्याचे प्रमाण कमी होण्याबरोबरच पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीलाही चालना मिळते. स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कचरा विलगीकरणाची सवय कायम ठेवावी.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आवाहन करताना सांगितले की, शहर स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी नागरिकांनी ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा अशा चार प्रकारांत कचरा विलगीकरणाची सवय कायम ठेवावी. नागरिकांचा वाढता सहभाग ही या उपक्रमाची जमेची बाजू ठरत असून, ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही संकल्पना अधिक बळकट होत आहे.

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, कचरा व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा सहभाग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. झिरो वेस्ट स्लम उपक्रमामुळे कचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण वाढत असून, कचरा संकलन आणि प्रक्रियेमध्ये कार्यक्षमता निर्माण होत आहे. नागरिकांनी या उपक्रमात अधिकाधिक सहभागी होऊन शहराच्या स्वच्छता चळवळीला बळ द्यावे.

कचऱ्याचे योग्य विलगीकरण केल्यास त्याचा पुनर्वापर, पुनर्निर्मिती व सुरक्षित विल्हेवाट लावणे अधिक सुलभ होते. ओला कचरा कंपोस्ट निर्मितीसाठी, तर सुका कचरा पुनर्वापरासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे प्रत्येक घरातून चार प्रकारांत कचरा विलगीकरण होणे ही काळाची गरज आहे, असे मत उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी व्यक्त केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘कृष्णायन’ या तीन दिवसीय भागवत कथनाने श्रोते मंत्रमुग्ध
Next Article अतिक्रमणाविरुद्ध महापालिकेची धडक मोहीम; अडीच महिन्यांत ८२० ठिकाणी कारवाई
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
आळंदी

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज  | आळंदी  आळंदी येथील चाकण चौक श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ…

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?