Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

August 28, 2026

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»४१२ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर संकलनाचा टप्पा पार
पिंपरी चिंचवड

४१२ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर संकलनाचा टप्पा पार

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 25, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

कर वसुलीत वाकड अव्वल;

पालिकेच्या तिजोरीत ४१२.९७ कोटींची भर

मालमत्ता करसवलतींचा लाभ घेण्यास शेवटचे काही दिवस

पिंपरी, (हिंदवी न्यूज)l- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कर संकलनात ४१२ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. दि. १ एप्रिल २०२६ ते २२ जून २०२६ या कालावधीत ३ लाख ६५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी जवळपास ४१२ कोटी ९७ लाख रुपयांचा मालमत्ता कर भरला असून, कर संकलनात सातत्याने वाढ होत आहे. महापालिकेच्या १८ क्षेत्रीय कार्यालयांपैकी वाकड विभागाने सर्वाधिक ५६.३९ कोटी मालमत्ता कर संकलित केला आहे. तसेच, त्याखालोखाल थेरगाव विभागाने ३७.३६ कोटी, कस्पटे वस्ती विभागाने ३२.९१ कोटी, किवळे विभागाने ३०.३८ कोटी मालमत्ता कर संकलित केला आहे.

याचबरोबर मालमत्ता कराच्या सामान्य करावर विविध प्रकारच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता केवळ काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सवलतींची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून नागरिकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता त्वरित मालमत्ता कर भरून उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने केले आहे.

महापालिकेकडून आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दि. १ एप्रिल २०२६ ते २२ जून २०२६ या कालावधीत ३ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरून १० टक्के सवलतीचा लाभ घेऊन ३५८ कोंटींचा ऑनलाईन भरणा केला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमधील मालमत्ता कर काउंटर शनिवार व रविवारदेखील सुरू ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही आपल्या जवळच्या विभागीय कार्यालयात जाऊन मालमत्ता कर भरता येणार आहे.

—

क्षेत्रीय कार्यालयांनुसार वसुली

१. वाकड – ५६.३९ कोटी

२. थेरगाव – ३७.६६ कोटी

३. कस्पटे वस्ती – ३२.९१ कोटी

४. किवळे – ३०.३८ कोटी

५. चिखली – २९.८१ कोटी

६. चिंचवड – २७.६२ कोटी

७. भोसरी – २५.६८ कोटी

८. पिंपरी-वाघेरे – २५.४० कोटी

९. मनपा भवन – २४.०३ कोटी

१०. मोशी – २३.६६ कोटी

११. सांगवी – २१.९२ कोटी

१२. आकुर्डी – १६.७३ कोटी

१३. फुगेवाडी-दापोडी – १४.३६ कोटी

१४. चऱ्होली – १४.११ कोटी

१५. निगडी प्राधिकरण – १०.४४ कोटी

१६. दिघी-बोपखेल – ९.६९ कोटी

१७. तळवडे – ९.२८ कोटी

१८. पिंपरी नगर – २.८१ कोटी

*एकूण कर संकलन– ४१२.९७ कोटी रुपये

 

🗣💬पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात प्रत्येक करदात्याचे योगदान महत्त्वाचे आहे. नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरल्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि इतर नागरी सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देता येतात. महापालिकेने विविध सवलती उपलब्ध करून दिल्या असून, नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी कर भरून या सवलतींचा लाभ घ्यावा.

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका

 

🗣💬मालमत्ता कर हा महापालिकेच्या महसुलाचा प्रमुख स्रोत आहे. शहरातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसह विविध विकासकामांसाठी या निधीचा उपयोग केला जातो. ऑनलाइन कर भरणाऱ्यांसाठी १० टक्के सवलत तसेच इतर विविध सवलती उपलब्ध आहेत. नागरिकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित कर भरणा करून सवलतींचा लाभ घ्यावा.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

 

🗣💬नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये शनिवार व रविवारदेखील मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेवटच्या दिवसांतील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी जवळच्या विभागीय कार्यालयात किंवा ऑनलाइन माध्यमातून मालमत्ता कर भरावा. वेळेत कर भरणे हे जबाबदार नागरिकत्वाचे प्रतीक असून, त्यातून शहर विकासालाही चालना मिळते.

-तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअतिक्रमणाविरुद्ध महापालिकेची धडक मोहीम; अडीच महिन्यांत ८२० ठिकाणी कारवाई
Next Article रविवारी शहरात ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

August 28, 2026

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 28, 20260
Spread the love

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएल) हजारो सेवकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएल कर्मचाऱ्यांना आता राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?