Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»मालमत्ता करावरील ५ ते ५० टक्क्यांपर्यंतच्या सवलतींचा लाभ घेण्याची अखेरची संधी! विविध कर सवलतींचा लाभ ३० जूनपर्यंतच घेता येणार
पिंपरी चिंचवड

मालमत्ता करावरील ५ ते ५० टक्क्यांपर्यंतच्या सवलतींचा लाभ घेण्याची अखेरची संधी! विविध कर सवलतींचा लाभ ३० जूनपर्यंतच घेता येणार

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 25, 2026Updated:June 25, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- मालमत्ता करावरील आकर्षक सवलतींचा लाभ घेण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांकडे आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून वेळेत कर भरणाऱ्या, ऑनलाइन मालमत्ता कर, महिला मालमत्ताधारक, दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या संस्था आणि आस्थापनांसाठी ५ ते ५० टक्क्यांपर्यंतच्या विविध सवलती देण्यात येत आहेत. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम तारीख असून त्यानंतर पूर्ण कर भरावा लागणार आहे.

महानगरपालिकेने वेळेत कर भरणाऱ्या, ऑनलाइन मालमत्ता कर, महिलांच्या नावावर मालमत्ता असलेल्या तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या नागरिकांसाठी आणि संस्थांसाठी विशेष सवलती लागू केल्या आहेत. अनेक मालमत्ताधारकांनी या सवलतींचा लाभ घेतला आहे. तसेच अनेक मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही. अशा मालमत्ताधारकांना ३० जून २०२६पूर्वी मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घ्या, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, ३० जूनपूर्वी कर भरल्यास मिळणारी ५ टक्के सवलत आणि ऑनलाइन कर भरण्यासाठी मिळणारी अतिरिक्त ५ टक्के सवलत यामुळे पात्र मालमत्ताधारकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच महिलांच्या नावावरील निवासी मालमत्तांसाठी ३० टक्के, दिव्यांग व्यक्तींसाठी ५० टक्के आणि स्वातंत्र्यसैनिक, विधवा पत्नी यांना मालमत्ता करात सवलत देण्यात आली आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या गृहनिर्माण संस्था आणि आस्थापनांनाही विविध सवलती दिल्या जात आहेत. कंपोस्टिंग प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP), झिरो वेस्ट संकल्पना तसेच ग्रीन बिल्डिंग उपक्रम राबविणाऱ्या संस्थांना ३ टक्क्यांपासून १५ टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ मिळू शकतो.

मालमत्ता करातून मिळणारा निधी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, उद्याने आणि विविध नागरी विकासकामांसाठी वापरला जातो. त्यामुळे नागरिकांनी सवलतींचा लाभ घेत वेळेत कर भरून शहर विकासात सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून करण्यात आले आहे.

सामान्य करावरील प्रमुख सवलती

• ३० जूनपूर्वी कर भरल्यास – ५ टक्के सवलत

• ऑनलाइन कर भरल्यास – ५ टक्के अतिरिक्त सवलत

• महिलांच्या नावावरील एका निवासी मालमत्तेस – ३० टक्के सवलत

• दिव्यांग व्यक्तीच्या नावावरील एका मालमत्तेस – ५० टक्के सवलत

• स्वातंत्र्यसैनिक, सैनिक विधवा पत्नीस एका निवासी मालमत्ता करावर सवलत. अथवा त्यांच्या पत्नींच्या एका निवासी मालमत्तेस – ५० टक्के सवलत

• ऑनसाइट कंपोस्टिंग – ५ टक्के सवलत

• एसटीपी प्लांट – ३ टक्के सवलत

• कंपोस्टिंग व एसटीपी दोन्ही – ८ टक्के सवलत

• झिरो वेस्ट प्रकल्प – ८ टक्के सवलत

• झिरो वेस्ट व एसटीपी – १० टक्के सवलत

• ग्रीन बिल्डिंग – ५ ते १५ टक्क्यांपर्यंत सवलत

सवलतींचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ हीच अंतिम तारीख आहे

…..

🗣💬पिंपरी चिंचवड हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि इतर नागरी सुविधांचा विस्तार करण्यासाठी महापालिकेला सक्षम आर्थिक पाठबळ आवश्यक असते. नागरिकांनी भरलेला मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा महत्त्वाचा आधार आहे. महापालिकेने दिलेल्या विविध सवलतींचा लाभ घेत ३० जून २०२६ पूर्वी कर भरावा आणि आपल्या शहराच्या विकासात थेट सहभाग नोंदवावा.

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

🗣💬महानगरपालिकेने दिलेल्या विविध सवलतींचा लाभ घेत शहरातील लाखो मालमत्ताधारकांनी वेळेत मालमत्ता कर भरला असून त्यांना आर्थिक लाभही मिळाला आहे. मात्र, अद्याप अनेक मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी आहे. उपलब्ध सवलतींचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांनी ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरावा. नागरिकांच्या कररूपाने मिळणाऱ्या महसुलातूनच शहरातील विकासकामे आणि नागरी सुविधा अधिक सक्षमपणे राबविता येतात.

• डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

🗣💬मालमत्ता करावरील विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर १ जुलैपासून थकीत कर वसुलीसाठी नियमानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये नोटिसा, जप्ती तसेच इतर कायदेशीर उपाययोजनांचा समावेश असू शकतो. त्यामुळे नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी आणि उपलब्ध सवलतींचा लाभ घेण्यासाठी मुदतीपूर्वी मालमत्ता कर भरावा.

• सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरविवारी शहरात ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
Next Article मेट्रो विस्तार, जलनिस्सारण सुधारणा, अग्निसुरक्षा, आरोग्य सुविधा व विविध विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?