Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»इंडो अथलेटिक्स सोसायटीची १० वी पुणे–पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवड

इंडो अथलेटिक्स सोसायटीची १० वी पुणे–पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 26, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

२३५० सायकलस्वारांचा विक्रमी सहभाग;  भारतातील सर्वात मोठ्या सायकल वारीचा मान

पिंपरी,(हिंदवी न्यूज)- संपूर्ण भारतातील क्रीडा व आरोग्य क्षेत्रा कार्यरत असलेल्या इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेली दहावी पुणे–पंढरपूर सायकल वारी शनिवारी (२० जून) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. देहू येथील गाथा मंदिरातून पहाटे प्रस्थान केलेल्या या वारीत तब्बल २३५० सायकलस्वारांनी सहभाग नोंदवत २३५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.

यंदाचे वर्ष सायकल वारीच्या दहाव्या पर्वाचे असल्याने सहभागींचा उत्साह विशेष पाहायला मिळाला. मागील सर्व वर्षांतील विक्रम मोडत यंदा देशभरातून आलेल्या सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पीसीएमसीचे बापूसाहेब गायकवाड, एमआयडीसीचे अधिकारी प्रकाश शेटबाळे, उद्योजक अन्नारे बिरादार, तात्यासाहेब शेवाळे, बैद्यनाथ हॉस्पिटल संभाजीनगरचे डॉ. संदीप सानप व अनिल सानप तसेच महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक श्रीराम पानझाडे यांच्यासह आय ए एस चे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ व इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

इंडो अथलेटिक्स सोसायटीचे वारी प्रमुख गिरीराज उमरीकर यांनी सांगितले की, “वारीचे हे दहावे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व सहभागी सायकलस्वारांनी एका दिवसात देहू ते पंढरपूर हा प्रवास पूर्ण केला. विशेष म्हणजे यंदा सुमारे ३०० महिला आणि १०० हून अधिक बालसायकलस्वारांनी सहभाग घेतला. महाराष्ट्राबाहेरील राज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर सायकलस्वार या उपक्रमात सहभागी झाले.”

*सायकल वारीची प्रेरणादायी वाटचाल*

भारतात सायकल वारीची परंपरा रुजविण्याच्या उद्देशाने इंडो अथलेटिक्स सोसायटीने २०१६ मध्ये अवघ्या ७ जणांसह या उपक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर २०१७ मध्ये २४, २०१८ मध्ये १६०, २०१९ मध्ये सुमारे ५०० सहभागी झाले. कोविड काळातही हा उपक्रम खंडित झाला नाही. २०२१ मध्ये १७५ जणांनी पुणे–पंढरपूर अंतर पूर्ण केले. त्यानंतर २०२२ मध्ये १२००, २०२३ मध्ये १५००, २०२४ मध्ये १७५०, २०२५ मध्ये १९५० आणि यंदा २३५० हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले. त्यामुळे भारतातील सर्वात मोठी सायकल वारी म्हणून या उपक्रमाने नवा इतिहास रचल्याची माहिती संस्थापक सदस्य गजानन खैरे यांनी दिली. तसेच प्रमुख सदस्य अजित पाटील व गणेश भुजबळ यांनी वारी मार्ग आणि नियोजनाविषयी सविस्तर माहिती दिली.

*सायकल वारी मार्ग*

देहू – निगडी – नाशिक फाटा – हडपसर – उरुळी कांचन – भिगवण – इंदापूर – टेंभुर्णी – पंढरपूर

*स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान*

या भव्य उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गिरीराज उमरीकर, अविनाश चौगुले, अमित पवार, अनुप कोहले, अजित गोरे, अविनाश अनुसे, अभिजीत सरोदे, अजय चौरसिया, दीपक गुरुकुल, देविदास खुर्द, कपिल पाटील, मारुती विधाते, मंदार शेंडे, नितीन पवार, प्रदीप जी टाके, प्रमोद चिंचवडे, प्रणय कडू, प्रतीक पवार, प्रशांत तायडे, पवन आहेर, प्रशांत जाधव, रमेश माने राहुल राणे, संतोष नखाते, सुनील चाको, सुशील मोरे, श्रीकांत चौधरी, तुषार माने, विवेक कडू, योगेश तावरे, अरुण कुमार यादव, सुधाकर टिळेकर, शैलेश पाटील, अमृता पाटील, मनोज काशीद, नारायण मगडूत, मदन शिंदे, हेमंत दांगट पाटील यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

याशिवाय इंदापूर येथे नगरपालिकेतर्फे नगराध्यक्ष भरतभाई शहा, टेंभुर्णी येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय बाबा कोकाटे त्याचप्रमाणे विविध सायकलिंग गट, सामाजिक संस्था, स्थानिक संघटना आणि असंख्य स्वयंसेवकांचे सहकार्य लाभल्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. सायकलिंग, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि वारकरी परंपरेचा संगम घडवून आणणाऱ्या या सायकल वारीने समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे.

इंडो अथलेटिक्स सोसायटीची १० वी पुणे–पंढरपूर सायकल वारी
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदेहू ते आळंदी पालखी मार्ग “संतभूमी” म्हणून जाहीर करा – अभय टिळक
Next Article बनारस – महाराष्ट्र हा ऐतिहासिक अनुबंध! – कुमकुम सिंह
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?