चिंचवड गावातून काळेवाडीकडे जाणारा रस्ता नदीचा प्रवाह रस्त्यावर आल्याने बंद.
हिंदवी न्यूज | पिंपरी
चिंचवड गावातून काळेवाडीकडे जाणारा रस्ता नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सकाळ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर वाढत असून नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी या मार्गावर जाणे टाळावे.तसेच वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
![]()
