Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड येथे महाबैठक संपन्न
पिंपरी चिंचवड

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड येथे महाबैठक संपन्न

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 21, 2026Updated:July 21, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे आवाहन

​हिंदवी न्यूज | पिंपरी
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कासारवाडी येथे भाजप पदाधिकाऱ्यांची महाबैठक पार पडली. बैठकीत आगामी संघटनात्मक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. पदवीधर मतदार नोंदणी मोहीम आणि आगामी रक्तदान शिबिराच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करत ही दोन्ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
​बैठकीत मार्गदर्शन करताना रवींद्र चव्हाण यांनी पदवीधर मतदार नोंदणीच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना केली. पिंपरी-चिंचवड शहरासाठी किमान ७५,००० पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पक्षाने निश्चित केले असून, हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने किमान ५०० पदवीधरांची नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ नोंदणी करणे पुरेसे नसून, त्यासाठीची अचूक कागदपत्रे आणि ‘हार्ड कॉपी’ कार्यालयात वेळेत जमा करण्याची जबाबदारी संबंधितांवर सोपवण्यात आली आहे. या कामाच्या प्रगतीचा दररोजचा आढावा घेण्यासाठी एक विशेष ‘चार्ट’ तयार करून तो जिल्हा अध्यक्ष आणि गटनेत्यांकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या २० ऑगस्टपर्यंत ही मोहीम शंभर टक्के पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, या कामातील सहभागाचा उपयोग भविष्यात पद वाटपावेळी निकष म्हणून केला जाईल, असा  इशारा त्यांनी यावेळी दिला.
​रक्तदान मोहिमेबाबत बोलताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा संपूर्ण महाराष्ट्रात १ लाख रक्तदानाचा संकल्प पक्षाने केला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या उपक्रमात पिंपरी-चिंचवडचा सहभाग म्हणून किमान ५,००० रक्तदानाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट आहे. कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे  अनावश्यक जाहिरातबाजी  करण्यापेक्षा, रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यात स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मोहिमेत शहरातील सर्व ४ सरचिटणीस, १४ मंडळांचे अध्यक्ष, २० पदाधिकारी आणि १०५ सदस्यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

​ या बैठकीत प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी संघटनात्मक आढावा घेतला. रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट केले की, नगरसेवक आणि संघटना हे वेगळे घटक नसून सर्वांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. बीएलए-२ (BLA-2) चे काम पूर्ण झाले असले तरी, मतदारांचे मॅपिंग अद्याप अपेक्षित गतीने झालेले नाही, त्यामुळे पुढील १८ दिवसांत हे काम पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे. शहरात पदवीधर मतदानाची टक्केवारी वाढवणे हे आपले ध्येय असून, त्यादृष्टीने प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. पदाधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून हे दोन्ही उपक्रम निश्चित यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड जिल्हा महाबैठकीस भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आ. महेशदादा लांडगे, आ. उमाताई खापरे, आ. शंकरशेठ जगताप, आ. अमित गोरखे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडे, पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, पदवीधर नोंदणी प्रमुख राजेश पिल्ले, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांसह सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व मंडलाध्यक्ष, सर्व मोर्चे, आघाडी, प्रकोष्ठ, सेल यांचे अध्यक्ष, तिन्ही विधानसभांचे BLA-1 व मोठ्या संख्येने प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

महाबैठकीचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले, सूत्रसंचालन संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी केले. सरचिटणीस विकास डोळस यांनी आभार मानले.

Ravindra chavan bjp
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleलग्नाच्या आमिषाने ४२ लाखांची फसवणूक करणार्‍याचा जामीन फेटाळला
Next Article जंजीरा किल्ल्यावर सरकारने भगवा झेंडा लावावा अन्यथा आंदोलन – डॉ. श्रमिक गोजमगुंडे
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे… ‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’

August 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?