हिंदवी न्यूज | पिंपरी
गेले दोन ते तीन महिन्यांपासून चिंचवडगाव व परिसरात सतत विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा होत आहे. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे चिंचवडगाव, केशवनगर, तानाजी नगर व परिसरातील नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी महावितरण अभियंता मुंडे यांना निवेदन दिले आहे.
योग्य नियोजन नसल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. अनेक वेळा खाजगी एजन्सी वेळेत न भेटणे, केबल टेस्टिंग गाडी वेळेत न मिळणे ही महत्त्वाची कारणे पुढे केली जातात. परंतु या दोन गोष्टीचे नियोजन अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे. नियोजनाचा अभाव असल्या मुळे याचा जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी खाजगी एजन्सीच महावितरण चे काम करत आहे. मग खाजगी एजन्सी मनमानी करत असेल तर वरिष्ठ अधिकारी गप्प का बसतात. असा सवाल बच्चे यांनी केला आहे.
तरीही वरिष्ठांनी यात नीट लक्ष घालावे व यापुढे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा जनतेच्या रोशाला अधिकाऱ्यांनाच सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.


