Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; कामगार नेते यशवंत भोसले यांच्या तिरंगा रॅलीत आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची उपस्थिती
पिंपरी चिंचवड

तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; कामगार नेते यशवंत भोसले यांच्या तिरंगा रॅलीत आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची उपस्थिती

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 16, 2026Updated:August 16, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहना- नुसार संत तुकाराम नगर मध्ये (दि.१५) रोजी भव्य तिरंगा रॅली राष्ट्रीय श्रमिक आघाडी, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादितच्या वतीने राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. या रॅलीला भोसरी मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे, विधान परिषद आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, सदाशिव खाडे, पक्षनेते प्रशांत शितोळे, अजीज भाई शेख आधी मान्यवर उपस्थित होते. रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. रॅली पंचशील बुद्ध विहार मार्गे संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन, मैत्री चौक, जिरे टोपी चौक मार्गे , महेश नगर, डी वाय पाटील हॉस्पिटल ,वायसीएम हॉस्पिटल मार्गे आचार्य अत्रे सभागृह, वल्लभ नगर, हुतात्मा चौक मार्गे साईबाबा मंदिर, शनी मंदिर चौक मार्गे रॅलीचे श्रमिक आघाडीचे कार्यालय येथे सभेत रूपांतर झाले.

यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले की, देशभक्तीचा उत्साह आणि भारतमातेविषयीचे प्रेम व्यक्त करत कामगार नेते तथा भाजपाचे नेते यशवंतजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिकांनी हातात तिरंगा घेत रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.यशवंत भोसले हे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. मात्र, भारतमातेविषयी असलेले त्यांचे प्रेम आणि देशभक्तीची भावना या तिरंगा रॅलीतून प्रकर्षाने दिसून आली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत नागरिकांचा मोठा जनसमुदाय सहभागी झाला.रॅलीमध्ये विशेषतः महिलांचा सहभाग लक्षवेधी ठरला. वयाची तमा न बाळगता अनेक ज्येष्ठ महिलांनीही तब्बल पाच ते सहा किलोमीटर पायी चालत या रॅलीत सहभाग घेतला. यशवंत भोसले यांच्यावरील विश्वास आणि देशाविषयी असलेल्या प्रेमातून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रॅलीत सहभागी होत देशभक्तीचा संदेश दिला.

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले की, देशाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर, राष्ट्रीय श्रमिक आघाडी, संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्था तसेच स्थानिक मंडळे आणि विविध कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने महिला, युवक,  कामगार, श्रमिक आणि स्थानिक नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण नव्या पिढीला व्हावे, त्याग आणि बलिदानाची जाणीव तरुणांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने देशभर तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन जनतेने मोठ्या उत्साहाने स्वीकारले असून, या उपक्रमामुळे नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा देशप्रेमाची भावना जागृत झाली आहे.

सभेच्या ठिकाणी उपस्थितांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या एकता, अखंडता आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याचा संदेश दिला. यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या भव्य रॅलीचे उपस्थित नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी यशवंतभाऊ भोसले यांचे आभार मानत देशभक्तीच्या या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीमुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

या तिरंगा रॅलीचे संयोजन मंडल अध्यक्ष मंगेशजी धाडगे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली थोरात, नंदू आप्पा कदम, किरण सुवर्ण, जयदेव अक्कलकोटे, मुन्ना बाविस्कर, उद्योजक दीपक शेठ पाटील, दिनेश पाटील, राहुल शितोळे, दत्ता गायकवाड, अमोल घोरपडे, राहुल खाडे , संतोष दुबे, विजय दळवी, मनिष अमोलिक, प्रभजोत सिंगहंस आदींनी केले.

Rally yashvantbhau bhosle
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुणे इनर रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यासाठी ४४ कोटींचा निधी वर्ग; भूसंपादनाच्या कामाला वेग!
Next Article सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पीएमआरडीए’च्या ‘इनर रिंग रोड’ भूसंपादनाला गती; मावळ, मुळशी अन् हवेलीत ग्रामबैठकांचा धडाका!

October 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुळशी

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | नवी सांगवी साई चौक येथील लोकनेते लक्ष्मण भाऊ भाजी मार्केट मध्ये आमदार…

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?