(हिंदवी न्यूज | पिंपरी-चिंचवड)
पिंपरी-चिंचवड शहरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. शहरातील विविध मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.
यावेळी शहरातील विविध भागातील राम मंदिरांमध्ये विशेष पूजाअर्चा, अभिषेक आणि भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी राम जन्मोत्सवानिमित्त दुपारी १२ वाजता ‘राम जन्म’ सोहळा साजरा करण्यात आला. शहरातील विविध संस्था व संघटनांच्या वतीने शोभायात्रा तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, सायंकाळी विविध भागात ढोल-ताशांच्या गजरात, भगवे झेंडे आणि जय श्रीरामच्या घोषणा, देत मिरवणुक काढण्यात आली. यात महिला, युवक आणि लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत उत्सवाचा आनंद व्दिगुणीत केला. घरोघरी पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा करून श्रीराम नवमी साजरी करण्यात आली. शहरातील मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला
यावेळी वाहतुकीत बदल करण्यात आले होते. प्रशासनाच्या वतीने सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि स्वच्छतेच्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
