हिंदवी न्यूज | पिंपरी
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चार शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले . यामध्ये संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची माध्यमिक आश्रम शाळा आष्टा, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, विलासराव शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टा, बी .के .चौगुले माध्यमिक विद्यालय आष्टा या शाळांचा समावेश होता .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगली जिल्हा समन्वयक प्रा. एस. आर .पाटील यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालवयात मुलांना संस्कारमय व मूल्यशिक्षण देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले .
ह भ प वाबळे महाराजांनी संस्काररूपी कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले . कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ह भ प प्रकाश काळे महाराजांनी आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी .ज्ञानेश्वरी हा केवळ अभ्यासाचा ग्रंथ नाही तर दैनंदिन संस्काराची गाथाच आहे. तसेच हे संस्कार विद्यार्थ्यांनी अंगिकारले तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आदर्श घडण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले. इयत्ता पाचवी ते सातवी साठी हरिपाठ वाचन व इयत्ता आठवीसाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम राबविण्यात येणार आहे . संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब डांगे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमासाठी ह भ प प्रकाश काळे महाराज, ह भ प वाबळे महाराज ,प्रा.एस आर पाटील, शिंगाडे साहेब ,मुख्याध्यापक बोते सर ,सचिन कोरे ,शहाजी पाटील, सुभाष पाटील,ह भ प दाभाडे महाराज ,ह भ प प्रल्हाद महाराज भोईभार,थोरात सर, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .





