पिंपरी (हिंदवी न्यूज)
यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दिं. ८ मे २०२६ रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. बारावीच्या निकालानंतर दहावीतील विद्यार्थ्यांना व पालकांना कित्येक दिवसांपासून निकालाची प्रतिक्षा होती. अखेर उद्या राज्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणारा हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पहाता येणार आहे.
विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर आपला निकाल पहाता येणार आहे.
1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahahsscboard.in
3. https://sscresult.mkcl.org
निकाल पहाण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, त्यानंतर SSC Examination result 2026 या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर तसेच आईचे नावातील सुरवातीची तीन अक्षरे टाकायची आहेत. हि माहीती प्रविष्ट करताच View Result या पर्यायावर क्लिक करावे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल स्क्रीनवर दिसेल. व विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुणपत्रिका उपलब्ध होतील. त्याची प्रिंट काढून ठेवा. गुणपडताळणी व पुनर्मुल्यांकनाबाबत मंडळाकडून स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
![]()
