Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026

वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

May 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 10, 2026Updated:May 10, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी (हिंदवीन्यूज)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधूकर पवळे सभागृहात पार पडली. या सभेत शहरातील आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, स्वच्छता यासह विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी स्थायी समिती सदस्यांसह महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या सभेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या परिसरात आरोग्य शिबिर, भूमिपूजन, उद्घाटन, जयंती इत्यादींसाठी मंडप स्टेज व्यवस्था करणे, आकुर्डी हॉस्पिटलमध्ये फायर सेफ्टी ऑडिटनुसार अनुषंगिक कामे करणे व देखभाल-दुरुस्ती कामे करणे, मनपा कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालयांनी कचरा संकलन व अलगीकरण जनजागृती करणे व शहर कचरामुक्त करण्यासाठी जनजागृती संस्थांची नेमणूक करणे, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी वाढावी तसेच शैक्षणिक गुणवत्ता व पटसंख्या वाढवण्यासाठी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणे, मनपाच्या विविध विभागांसाठी आवश्यकतेनुसार व मागणीनुसार ६५ इंची एलईडी टीव्ही (२० नग) एक वर्ष कालावधीकरिता खरेदी करणे, प्रभाग क्रमांक ३१, ३२ नवी सांगवी, जुनी सांगवी येथे आवश्यकतेनुसार नवीन बोअरवेल घेणे व जुन्या बोअरवेलची देखभाल दुरुस्ती करणे, मनपाच्या चार शाळांसाठी स्मार्ट किड्स फिटनेस इक्विपमेंट साहित्य चार किट खरेदी करणे, ह क्षेत्रीय कार्यालयातील विविध प्रशासकीय इमारती, शाळा व कार्यालयांमध्ये फायर सेफ्टी ऑडिटनुसार अनुषंगिक कामे करणे व देखभाल-दुरुस्ती करणे, या कामांना मंजूरी देण्यात आली.

तसेच आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात फायर सेफ्टी ऑडिटनुसार अनुषंगिक कामे करणे व देखभाल-दुरुस्ती कामे करणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व मैला शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये फलक लावणे व अनुषंगिक कामे करणे, नवीन तालेरा येथे विविध विद्युत विषयक कामांसाठी कुशल कर्मचारी पुरवणे व इतर अनुषंगिक कामे करणे, रावेत येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुलावरून सुशोभीकरण अंतर्गत डेकोरेटिव्ह फिटिंग पोल बसविणे व अनुषंगिक विद्युत विषयक कामे करणे, मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व मनपा उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता रेडिओ स्टेशनवरून जाहिराती प्रसिद्ध करणे, उद्यान वृक्ष संवर्धन विभागासाठी संगणक प्रणालीद्वारे कामांचे सहनियंत्रण करण्यासाठी वेब व मोबाईल आधारित संगणक प्रणाली विकसित करणे, जिजामाता पिंपरी आकुर्डी मासुळकर हॉस्पिटल येथील ईटीपी विषयक चालन, देखभाल व दुरुस्तीचे कामकाज करणे, प्रभाग क्रमांक २३ थेरगाव गावठाणमधील परिसरातील किरकोळ देखभाल-दुरुस्ती व अनुषंगिक इतर स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्रमांक २७ रहाटणीमध्ये डीपी रस्त्यालगत फुटपाथ विकसित करणे व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्रमांक २४ थेरगाव येथे आवश्यकतेनुसार ब्लॉक फुटपाथ, डिव्हायडर व नाला-दुरुस्तीची कामे तसेच इतर स्थापत्य विषयक कामे करणे, केंद्र शासनाने नव्याने जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रकल्पाचे कामकाज चालवण्यासाठी एजन्सीची निवड करणे, आकुर्डी येथील कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालयातील क्ष-किरण विभागाकरिता आवश्यक असलेली डिस्कॉम संगणक प्रणाली कार्यान्वित करणे, महानगरपालिकेचे औद्योगिक प्रशिक्षण विभागांच्या नियंत्रणाखाली असणारे आकुर्डी माध्यमिक विद्यालय येथील एमएससीआयटी केंद्राचे अद्ययावतीकरण व नूतनीकरण करणे, मनपाचे नेत्र रुग्णालय व भोसरी रुग्णालय येथे फायर ऑडिट करणे, अहवालाप्रमाणे कामे करणे व अनुषंगिक कामे करणे, क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय चिंचवड येथील संग्रहालयाच्या स्वच्छतेविषयी कामाकरिता दोन कर्तव्यतत्पर आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक करणे, प्रभाग क्रमांक २५ येथील पुणे-बेंगलोर हायवेच्या पूर्वेकडील वाकड-पुनावळे-ताथवडे व प्रभागातील इतर परिसरातील नव्याने ताब्यात येणारे रस्ते विकसित करणे, प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख, खुशालनगर व प्रभागातील इतर परिसरातील पावसाळी पाण्याच्या लाईनची दुरुस्तीची कामे करणे, आवश्यकतेनुसार पाइपलाइन टाकणे व इतर स्थापत्य विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे करणे, प्रभाग क्रमांक १४ काळभोर नगर व इतर परिसरातील स्थापत्य विषयक कामे करणे, नेहरूनगर श्वान नियमन शस्त्रक्रिया केंद्रातील कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करणे, प्रभाग क्रमांक १६ मधील रावेत, किवळे व वाल्हेकरवाडी भागातील अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे व नाले साफसफाईसाठी व इतर आवश्यक कामांसाठी मशिनरी पुरविणे, प्रभाग क्र. २ चिखलीमधील नाल्यांची साफसफाई करणे, पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील मनपाच्या मैला शुद्धीकरण केंद्र तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करून घेण्यासाठी संस्थेची नेमणूक करणे, सांगवी मैला शुद्धीकरण प्रकल्पाचे चालन व देखभाल-दुरुस्ती करणे, थेरगाव उपविभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक २३ मध्ये विद्युत विषयक बाबींचे नूतनीकरण करणे, प्रभाग क्रमांक ११ मधील कृष्णा नगर, पूर्णा नगर, शरद नगर, शिवतेज नगर, कोयना नगर घरकुल प्रकल्प, हरगुडे वस्ती, नेवाळे वस्ती व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा करणे व नव्याने विकसित होणाऱ्या भागात जलनिस्सारण नलिका टाकणे आदी कामांना स्थायी समितीने मान्यता दिली.

 

“शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आजच्या सभेत आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रलंबित कामांना गती देण्यात आली आहे. विशेषतः शाळांचे सक्षमीकरण, रुग्णालयांची सुरक्षा आणि पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई या विषयांना आम्ही प्राधान्य दिले आहे. पारदर्शक कारभार आणि वेळेत काम पूर्ण करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”

– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका

Post Views: 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड शहरातील ड व ह क्षेत्रीय कार्यालयांतील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेची कारवाई
Next Article कस्तुरी मार्केट येथील ५० अनधिकृत दुकाने व पत्राशेडवर पालिकेची धडक कारवाई
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026

वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

May 16, 2026

पिंपरी चिंचवड मध्ये १६ मे पासून घरयादी व घरगणनेला प्रारंभ, नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे

May 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

By Hindavinewsnetwork@gmail.comMay 16, 20260
Spread the love

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी प्रभाग क्र. ३१ मध्ये…

Loading

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026

वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

May 16, 2026

पिंपरी चिंचवड मध्ये १६ मे पासून घरयादी व घरगणनेला प्रारंभ, नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे

May 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?