Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवड शहरातील ड व ह क्षेत्रीय कार्यालयांतील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेची कारवाई
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरातील ड व ह क्षेत्रीय कार्यालयांतील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेची कारवाई

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 10, 2026Updated:May 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी (हिंदवीन्यूज)

चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात व्यापक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपळे गुरव येथील ५३० चौ.मी. तसेच ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नवी सांगवी परिसरातील १ हजार ५४५ चौ.मी. अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेल्या आरसीसी बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच इतर नियमबाह्य उभारण्यात आलेली बांधकामे देखील पाडण्यात आली.

मागील दिवसात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयनिहाय करण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधातील धडक निष्कासन कारवाईचा आढावा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकताच घेतला. त्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात कारवाई अधिक सक्त करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागांमध्ये व्यापक कारवाई मोहीम हाती घेतली आहे.

ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या नेतृत्वात वार्ड क्र. २९, पिंपळे गुरव येथील गणेशनगर, साईनाथनगर, लक्ष्मीनगर परिसरातील एकूण ५३० चौ.मी. आरसीसी बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी उपअभियंता शाम गर्जे, बीट निरीक्षक विक्रम चव्हाण, राहुल निकम, उमेश लोंढे, ओंकार देशमुख, पूजा राठोड तसेच १३ एमएसएफ जवान, ७ मजूर, २ पोलीस, २ ट्रॅक्टर ब्रेकर आणि १ जेसीबी सहभागी होते.

ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वार्ड क्र. ३१ मधील नेताजी नगर, गांगर्डे नगर, विनायक नगर, गजानन नगर या भागात क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या नेतृत्वात एकूण १ हजार ५४५ चौ.मी. आरसीसी बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत उपअभियंता प्रताप मोरे, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे, बीट निरीक्षक शाबोद्दिन बागबान, रोहन कांबळे, प्रफुल्ल भोकरे, सुरज माने तसेच १८ एमएसएफ जवान, १० मजूर, २ ट्रॅक्टर ब्रेकर आणि १ जेसीबी यांच्या सहाय्याने ही कारवाई पार पडली.

महापालिकेच्या पथकाने केलेल्या तपासणीत विविध ठिकाणी विनापरवानगी आरसीसी बांधकामे, शेड तसेच इतर स्वरूपाची अनधिकृत वाढ आढळून आली. त्यानुसार संबंधितांवर कारवाई करत सुमारे काही हजार चौरस फूट क्षेत्रफळातील बांधकामे हटविण्यात आली.

 

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या कारवाईचा नियमित आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने पाहणी करावी. रस्त्यावर स्टॉल लावणाऱ्या फेरीवाल्यांवर देखील कारवाई करण्यात यावी. नागरिकांच्या सुरक्षेच्या तसेच शहराच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी. नागरिकांनीही नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.

  • डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजिजामाता रुग्णालयातील आरोग्य सेवांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला आढावा
Next Article पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?