Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»कला»शनिवारी चिंचवड मध्ये अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग
कला

शनिवारी चिंचवड मध्ये अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 15, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

भक्ती, संगीत आणि आत्मशोधाचा प्रवास घडवणारे भव्य नाटक – भाऊसाहेब भोईर 

पिंपरी,(हिंदवी न्यूज)-  पंढरीची वारी हा जगातील असा एकमेव सोहळा आहे की, या सोहळ्यात सर्व अठरा पग्गड जाती एकत्र येऊन वारी मध्ये सहभागी होतात.  देहू, आळंदी पासून पंढरपूर पर्यंत वारीत सहभागी होण्याचे आत्मिक समाधान हे अडीच तासात देण्याचा प्रयत्न “अंतर्नाद” या संगीत नाटकातून प्रेक्षकांना मिळेल. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या पसंतीला उतरेल असा ५१ कलाकारांचा सहभाग असलेल्या या प्रयोगात अभंग, गवळण, भारुड, पोवाड्याचा समावेश या सात्विक कार्यक्रमात आहे. अंतर्मनातील नाद समजून घेण्यासाठी आणि स्वतः मधला विठ्ठल शोधण्यासाठी सर्वांनी’अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी, (दि.१६) सायंकाळी ७ वाजता, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात येऊन पहावा, असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व मोरया थिएटरचे संस्थापक, “अंतर्नाद” चे निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी केले.

पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाऊसाहेब भोईर बोलत होते. यावेळी प्रणव सपकाळे, मनोज डाळिंबकर, निरंजन पेडगावकर, अंकिता शिवतरे, राजू बंग आदी उपस्थित होते. भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, वारीचं महत्व नवीन पिढीला “अंतर्नाद” मधून कळेल आणि त्यांना प्रेरणा मिळेल. संतांविषयी अनेक साहित्य, अभंग आहेत. परंतु या नाटकात त्याची आम्ही त्याची कॉपी केली नाही तर सर्व नवीन आहे. लोक संगीतात वापरली जाणारी बहुतांश सर्व वाद्य या संगीत नाटकात वापरली आहेत. आपल्या अंतरात्म्याचा आवाज समजून घेण्यासाठी आपण अंतर्नाद पहावे. संगीत, भक्ती आणि कलेचा वारसा जपणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक विश्वात ‘मोरया थिएटर्स’ एक नवी कोरी कलाकृती घेऊन येत आहे. पंढरीच्या वारीचा आणि आत्म्याचा प्रवास मांडणाऱ्या या भव्य संगीत नाटकाचा दुसरा प्रयोग हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २२ मे), सायंकाळी सात वाजता होणार आहे. रसिक प्रेक्षकांसाठी या नाटकाची तिकिटे ‘बुक माय शो’ आणि ‘तिकीट खिडकी’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तसेच चिंचवड येथील नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवरही विक्री सुरू आहे अशी माहिती दिग्दर्शक मनोज डाळिंबकर यांनी दिली.

नाटकाचे कथानकः “अंतर्नाद” हे केवळ नाटक नसून तो आत्म्याशी संवाद साधणारा एक भावस्पर्शी प्रवास आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या पवित्र भूमीकडे निघालेल्या माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आणि त्यातील वारकऱ्यांच्या श्रद्धेचे जिवंत चित्रण यात पाहायला मिळेल. दिंडीत सहभागी झालेल्या एका युवा वारकऱ्याची विठ्ठल भक्ती आणि त्यातून घडलेला त्याचा अंतर्मनातील प्रवास म्हणजे ‘अंतर्नाद’ होय. या नाटकाचा निर्माता म्हणून काम करताना, वारकरी परंपरेला अभिवादन करणारी ही आधुनिक कलाकृती रसिकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल, असा  विश्वास भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केला.

नाटकाचे लेखन विनोद रत्ना यांनी केले असून, संकल्पना व दिग्दर्शन मनोज डाळींबकर यांचे आहे. संगीत निरंजन पेडगावकर यांनी दिले आहे.  मुराद तांबोळी यांनी गीते शब्दबद्ध केली आहेत. नृत्य दिग्दर्शन अंकिता शिवतरे व सौगंध कापसे यांनी केले आहे. तांत्रिक बाजू अभिप्राय कामठे (प्रकाश योजना), कमलेश बिचे (रंगभूषा) आणि वेदिका काळे (वेशभूषा) यांनी सांभाळली आहे. सहाय्यक दिग्दर्शन आकाश थिटे यांनी केले आहे.

Loading

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनीट (NEET) परीक्षा रद्द प्रकरणी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र निषेध
Next Article ऊर्जा बचत धोरणाबाबत महापालिकेची महत्त्वपूर्ण बैठक
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

भाजपा शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 20260
Spread the love

विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर…

Loading

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?