Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य

May 17, 2026

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य
पिंपरी चिंचवड

मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 17, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

विश्वकोश निर्मिती मंडळ व पुस्तकांचे गाव भिलार येथे अभ्यास सहल

पिंपरी, (हिंदवी न्यूज)-  इंद्रायणी साहित्य परिषदेच्यावतीने वाई येथील प्रज्ञा पाठशाळा, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि पुस्तकांचे गाव भिलार येथे नुकतीच अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती. परिषदेचे संस्थापक आणि ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल आयजित करण्यात आली होती.  अभ्यास सहल अत्यंत प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि अविस्मरणीय ठरली, मराठी भाषेसाठी चाललेले हे कार्य अनमोल ठेवा असल्याची भावना यावेळी सहभागी सदस्यांनी व्यक्त केली.

या एकदिवसीय सहलीमध्ये साहित्य, वाचन, संस्कृती आणि इतिहास याविषयी उत्स्फूर्त चर्चा झाली. परिषदेचे पंचवीस सदस्य यामध्ये सहभागी झाले होते. सरला रेवगडे, डॉ. सीमा काळभोर, परिषदेचे सचिव रामभाऊ सासवडे आणि माणिक सस्ते यांनी या सहलीचे यशस्वी आयोजन केले. वाई येथील गणपती मंदिरात दर्शन, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा वाडा, यासह राज्याच्या निर्मितीनंतर मराठी भाषेचे महत्त्व विषद करणारी आणि भविष्यातील शेकडो वर्षे मराठीचा अनमोल ठेवा ठरलेल्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मुख्य कार्यालयास भेट दिल्यानंतर मराठी भाषेसाठी चाललेले कार्य पाहून सदस्यांनी आनंद व्यक्त केला. हा खरा मराठीचा गौरव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अरुण बोऱ्हाडे यांनी या विश्वकोशाचे महत्त्व विषद केले. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या स्थापनेमागे असलेली यशवंतराव चव्हाण यांची प्रेरणा आणि सुमारे चौतीस वर्षे अध्यक्षपदी असलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे अमूल्य योगदान, या विश्वकोशाचे मराठी भाषेसाठी असलेले अनमोल महत्त्व व उपयुक्तता त्यांनी सांगितली. तेथील ग्रंथालयामध्ये साहित्य, इतिहास, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणिशास्त्र, ललितकला, तंत्रज्ञान, विज्ञान, अंतराळ इत्यादी विषयातील सुमारे चव्वेचाळीस हजार आठशे एवढी ग्रंथसंपदा, संदर्भग्रंथ आहेत. विश्वकोशाचे आतापावेतो एकवीस खंड उपलब्ध आहेत. त्यामध्ये जीवनाच्या विविध क्षेत्रातील विषयांची माहिती मराठीतील *अ* ते *ज्ञ* पर्यंतच्या शब्दांपर्यंत सुमारे १८२४४ नोंदी (लेख) देण्यात आलेल्या आहेत.

तसेच विश्वकोशाखेरीज मुलांसाठी कुमार विश्वकोशही निर्माण करण्यात आले असून त्याचे बारा खंड प्रकाशित झाले आहेत. अलीकडेच ऑलिंपिक कोशाचे काम सुरू झालेले आहे. या सर्व कामांची माहिती आणि त्याची कार्यपद्धती पाहून सर्वजण मराठी विश्वात रममाण झाले. त्याच इमारतीमधील प्रज्ञा पाठशाळेचा इतिहास व कार्य समजून घेण्यात आले. तेथील संचालक अनिल जोशी यांनी याविषयी विस्तृत माहिती दिली. या पाठशाळेत सुमारे साडेदहा हजार हस्तलिखित पोथ्या असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाने, राज्य मराठी विकास संस्थेच्या पुढाकाराने, महाबळेश्वरजवळ पुस्तकांचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेल्या भिलार गावाला भेट दिली. भारतातील हा पहिलाच प्रकल्प असून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याच्या संवर्धनासाठी आणि वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न म्हणून लोकसहभागातून हा अभिनव प्रकल्प राबविला आहे. या गावातील पस्तीस ठिकाणी काही घरांतून, दुकान अथवा व्यावसायिक जागेतून पुस्तकांची दालने सुरू करण्यात आली आहेत. प्रकल्पाधिकारी नारायण हळदे यांनी यांविषयी माहिती दिली. तेजस्विनी देशमुख, दामोदर वहिले, डॉ. पौर्णिमा कोल्हे, माणिक सस्ते यांनी येथील नियोजन केले. सदस्यांनी संपूर्ण गावात फिरून या प्रकल्पाची पाहणी केली. पाचगणीजवळ असलेल्या गोडवली या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकास भेट देण्यात आली. महीपती साठे, सुदाम शिंदे, काळुराम दामू सस्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमात राम सासवडे, गीतांजली बोऱ्हाडे, स्वाती भोसले, संभाजी सस्ते, मुकुंद पापट, संदीप गावडे, सुरेश शंकर आल्हाट, पोपटराव पडवळ, मोतीराम राऊत इत्यादी पंचवीस सदस्य सहभागी झाले होते. इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने आजतागायत साहित्य, इतिहास व पुरातन वारसा क्षेत्रांची माहिती देण्यासाठी पाच अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.

 

Loading

Post Views: 0
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026

वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

May 16, 2026

पिंपरी चिंचवड मध्ये १६ मे पासून घरयादी व घरगणनेला प्रारंभ, नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे

May 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य

By Hindavinewsnetwork@gmail.comMay 17, 20260
Spread the love

विश्वकोश निर्मिती मंडळ व पुस्तकांचे गाव भिलार येथे अभ्यास सहल पिंपरी, (हिंदवी न्यूज)-  इंद्रायणी…

Loading

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026

वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

May 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?