Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»ऑनलाइन कर भरण्याकडे नागरिकांचा वाढता कल
पिंपरी चिंचवड

ऑनलाइन कर भरण्याकडे नागरिकांचा वाढता कल

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 8, 2026Updated:June 8, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

२ लाख ४९ हजार नागरिकांनी घेतला १० टक्के सवलतीचा लाभ

पिंपरी, (हिंदवी न्यूज) –  महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत चालू आर्थिक वर्ष (२०२६-२७) मध्ये मालमत्ता कर संकलन मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दि. १ एप्रिल २०२६ ते ४ जून २०२६ या कालावधीत २८९ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षातील कर संकलन मोहिमेला सकारात्मक सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत शहरातील २ लाख ७८ हजार १७ अधिक मिळकतधारकांनी आपल्या मालमत्तेचा कर भरला आहे, अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.

महापालिकेकडून मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या असून, विशेषतः ३० जूनपूर्वी कर भरणाऱ्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सवलतींना मोठा प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन पद्धतीने कर भरणाऱ्या नागरिकांना १० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याने डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत २ लाख ४९ हजार १४३ नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून मालमत्ता कर भरून सवलतीचा लाभ घेतला आहे. या माध्यमातून २६५ कोटी ८६ लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला असून, नागरिकांचा डिजिटल व्यवहारांकडे वाढता कल दिसून येत आहे.

पिंपरी चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या मालमत्ता तसेच मोकळ्या जागांसह एकूण ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या सर्व मालमत्ताधारकांना चालू आर्थिक वर्षाचे कर देयक वेळेत प्राप्त व्हावे, यासाठी कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत व्यापक स्तरावर नियोजन करण्यात आले होते. विशेषतः महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच मालमत्ता कर बिल वाटप मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांना वेळेत कर देयके उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.

महापालिकेकडून कर वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी थकबाकीदारांविरोधातही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मिळकतधारकांविरोधात जप्तीपूर्वीची नोटीस बजावण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित थकबाकीदारांनी तातडीने मालमत्ता कर भरून पुढील प्रशासकीय कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

महापालिकेकडून महिलांच्या नावावरील निवासी मालमत्ता, दिव्यांग व्यक्तीच्या नावावर असलेले मिळकतधारक तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या निवासी गृहनिर्माण संस्थांसाठी विविध प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. विशेषतः महिलांच्या नावावर एकमेव निवासी मालमत्ता असल्यास ३० टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ मिळत असून, नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

💬पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा महत्त्वाचा आर्थिक स्रोत असून, नागरिकांनी वेळेत कर भरल्यास शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरी सेवांच्या गुणवत्तेमध्ये अधिक सुधारणा करण्यास मदत होते. महापालिकेकडून विविध सवलती देण्यात येत असून, नागरिकांनी ३० जूनपूर्वी मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा.

- डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

 

💬चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर संकलनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः ऑनलाइन माध्यमातून कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय वाढली असून, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळत आहे. महापालिकेकडून महिलांच्या नावावरील मालमत्ता, दिव्यांग व्यक्तीच्या नावावर असलेले एका मालमत्तावर, पर्यावरणपूरक गृहनिर्माण संस्था तसेच वेळेत कर भरणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तातडीने मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा.

 -  सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Loading

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकामगार कल्याण मंडळाच्या वतीने उद्योगनगरला वृक्षारोपण
Next Article संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर कारवाई
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

भाजपा शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 20260
Spread the love

विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर…

Loading

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?