Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»जाते श्रमसंस्कृतीचे प्रतीक! – पद्मश्री गिरीश प्रभुणे
पिंपरी चिंचवड

जाते श्रमसंस्कृतीचे प्रतीक! – पद्मश्री गिरीश प्रभुणे

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

“सुंदर माझे जाते गं… ” कविसंमेलन उत्साहात

पिंपरी (हिंदवी न्यूज)- ‘जाते हे ग्रामसंस्कृती आणि श्रमसंस्कृतीचे प्रतीक आहे. पूर्वीच्या काळात बाई जात्यावर दळायला बसली की ओव्या सुचत आणि त्यातून आपले मौखिक लोकसाहित्य समृद्ध झाले!’ असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.

गोशाळा सभागृह, पुनरुत्थान समरसता गुरुकुम्, चिंचवडगाव येथे  शब्दधन काव्यमंच तर्फे आयोजित जात्यावर दळताना साहित्य विश्वातील पहिल्या ‘सुंदर माझे जाते गं…’ या अभिनव कविसंमेलनाचे उद्घाटन करताना गिरीश प्रभुणे बोलत होते. छाया कांकरिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे, प्रबोधनकार शारदा मुंडे, जात्यावरील ज्येष्ठ ओव्या गायिका इंदुबाई कणसे, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती. बाळकृष्णाच्या वेषभूषेतील सानवी स्वप्निल चव्हाण ही बालिका सर्वांच्या आकर्षण अन् कौतुकाच्या केंद्रस्थानी होती. सजवलेल्या जात्याचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन, सुभाष चव्हाण यांनी केलेले मंगलमय शंखवादन, संत जनाबाईंच्या ओव्यांचे गायन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर झालेल्या कविसंमेलनात संजय गमे, शोभा जोशी, तानाजी एकोंडे, राधाबाई वाघमारे, बाळकृष्ण अमृतकर, मेहमुदा शेख, आय. के. शेख, अंबादास रोडे, फुलवती जगताप, कैलास भैरट, संगीता सलवाजी, शामराव सरकाळे, कल्पना बंब, सूर्यकांत भोसले, शामला पंडित, जयश्री श्रीखंडे, सुभाष चटणे यांनी बाळकृष्णासमवेत जात्यावर दळण दळताना स्वरचित गेय कवितांचे सादरीकरण केले; तर इंदुबाई कणसे यांनी पारंपरिक ओव्यांचे गायन केले. नारायण कुंभार यांनी कविसंमेलनाचा लालित्यपूर्ण शैलीतून आढावा घेतला. शारदा मुंडे यांनी प्रबोधनपर मनोगत व्यक्त केले. नंदकुमार मुरडे यांनी प्रभावी कथाकथन केले.

छाया कांकरिया यांनी अध्यक्षीय मनोगतातून शब्दधन काव्यमंचाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाविषयी गौरवोद्गार काढले. याप्रसंगी संयुजा टाटिया यांच्या वतीने पुनरुत्थान समरसता *जाते श्रमसंस्कृतीचे प्रतीक! – पद्मश्री गिरीश प्रभुणे* मधील विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. मीरा कंक, अशोकमहाराज गोरे, अण्णा गुरव, बाळासाहेब साळुंके, दत्ता कांगळे, अरुण घोडके, सुधीर भालेराव, शोभना भालेराव, मानसी चिटणीस यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले.

Loading

Post Views: 25
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवृत्तपत्रे वाचणे हा छंद जडावा! -आण्णा जोगदंड
Next Article ‘शाश्वत स्वर’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

भाजपा शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 20260
Spread the love

विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर…

Loading

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?