महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा
पुणे, (हिंदवी न्यूज) – विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघातर्फे करिअर सिरीज यशाच्या वेगळ्या वाटा या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या जर्मन लँग्वेज बूस्टर कोर्स’ या जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाची सांगता बक्षीस समारंभाने करण्यात आली. यानिमित्त महासंघातर्फे बक्षीस वितरण व कौतुक सोहळा’ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जर्मन लँग्वेज A ग्रेड परीक्षेत यश मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यातआले. दहावीच्या परीक्षेमध्ये ८५ टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या ३१ विद्यार्थ्यांचा गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. महासंघातर्फे या मुलांना कमवा व शिका या योजने अंतर्गत जर्मनी मध्ये मोफत शिक्षण व स्टायपेंड सह जॉब मिळवण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यात येणार आहे
प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका स्वरदा बापट, नगरसेविका स्वप्नाली पंडित, श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्र. १ च्या मुख्याध्यापिका वीणा नाईक मॅडम, डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन च्या मुख्याध्यापिका उज्वला कदम यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन महासंघाचे मुख्य कार्यवाहक समीर दरेकर यांनी केले. जर्मन परीक्षेत ऋग्वेदी अरु, वेदांत जगताप, प्राजक्ता घोडके या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. अनन्या काळे, भार्गव घेनंद, सिद्धांत दरेकर, व आरव पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
शालेय मुलांसोबत पालकांनी जर्मन भाषा शिकण्यात विशेष उत्साह दाखवला. यापैकी विजया देशमुख, सुनील हांडे यांना आउटस्टँडिंग परफॉर्मर बक्षीस देण्यात आले. जर्मन भाषा प्रशिक्षक ट्रेनर नियाथ बनसोडे यांना 5 स्टार रेटिंग सह बेस्ट टीचर पुरस्कार देण्यात आला. इतर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक जयवंत बोरसे सर, विष्णू सुर्वे सर आणि विठ्ठल भरेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. असे प्रशिक्षण वर्ग नियमितपणे घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महासंघातर्फे देण्यात आली.
महासंघातर्फे अँड.कल्पना मोरे, प्रीतम तिखे, फारुख तांबोळी, हर्षद छल्लारे, पुरुषोत्तम पंडित, विशाल बनसोडे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
![]()
