Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार व रविवारीही कॅश काऊंटर सुरू राहणार
पिंपरी चिंचवड

मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार व रविवारीही कॅश काऊंटर सुरू राहणार

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

सवलतींचा लाभ घेण्यासाठी काही दिवस शिल्लक

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून नागरिकांना देण्यात आलेल्या विविध कर सवलतींचा अधिकाधिक लाभ घेता यावा, यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार व रविवारी    ( २७ व २८ जून) महापालिकेच्या सर्व १८ विभागीय कर संकलन कार्यालयांमधील कॅश काऊंटर सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १८ जून पर्यंत ३८१ कोटी ६० लाख रुपयांचा कर भरणा झाला आहे.

महापालिकेच्या वतीने दरवर्षी आर्थिक वर्षाच्या प्रारंभी मालमत्ताधारकांना विविध सवलती जाहीर केल्या जातात. यंदाही ३० जूनपर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांसाठी आकर्षक सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांपर्यंत सवलतींची माहिती पोहोचवण्यासाठी कर संकलन विभागाकडून एसएमएस, दूरध्वनीद्वारे संपर्क, जनजागृती मोहिमा, होर्डिंग्ज, सामाजिक माध्यमे तसेच विविध प्रचार माध्यमांचा वापर करून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक विभागीय कार्यालयातील सहायक मंडल अधिकारी आणि गट लिपिक मालमत्ताधारकांशी थेट संपर्क साधून त्यांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. या प्रयत्नांमुळे चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये कर संकलनाला गती मिळाली असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कर वसुली झाली आहे. ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध असली तरी अनेक नागरिक प्रत्यक्ष कार्यालयात येऊन रोखीने किंवा इतर माध्यमांतून कर भरत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व शेवटच्या दिवसांतील गर्दी कमी करण्यासाठी शनिवार व रविवारीही कॅश काऊंटर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या वतीने सर्व मालमत्ताधारकांना आवाहन करण्यात येत आहे की, उपलब्ध सवलतींचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरावा आणि शहर विकासात आपले योगदान नोंदवावे.

 

🗣💬शहराच्या प्रगतीमागे करदात्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि इतर नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. महापालिकेने दिलेल्या सवलतींचा लाभ घेत प्रत्येक नागरिकाने ‘माझा कर, माझे शहर’ ही भावना जपावी.

-रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका

—-

🗣💬करदात्यांना अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने शनिवार व रविवारीही कॅश काऊंटर सुरू ठेवण्यात आले आहेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. उपलब्ध सुविधांचा उपयोग करून नागरिकांनी अंतिम मुदतीपूर्वी कर भरणा करावा.

-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

—-

🗣💬३० जून ही सवलतींचा लाभ घेण्याची अंतिम संधी आहे. कर संकलन विभागाकडून एसएमएस, दूरध्वनी, जनजागृती मोहिमा आणि प्रत्यक्ष भेटींद्वारे मालमत्ताधारकांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. शेवटच्या दिवसांतील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी लवकरात लवकर कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा.

–सचिन पवार , उपायुक्त , पिंपरी चिंचवड महापालिका.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेच्या वाय.सी.एम.रूग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान संकलन कार्यक्रम
Next Article जर्मन लँग्वेज बूस्टर कोर्स’ प्रशिक्षण वर्गाची सांगता
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?