Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»अतिक्रमणाविरुद्ध महापालिकेची धडक मोहीम; अडीच महिन्यांत ८२० ठिकाणी कारवाई
पिंपरी चिंचवड

अतिक्रमणाविरुद्ध महापालिकेची धडक मोहीम; अडीच महिन्यांत ८२० ठिकाणी कारवाई

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

१०४ हजार चौरस मीटरहून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त.

नाले, रस्ते व सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेची मोहीम 

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते, पदपथ, नाले तसेच अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून १ एप्रिल २०२६ ते २२ जून २०२६ या कालावधीत शहरातील विविध भागांमध्ये एकूण ८२० ठिकाणी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण ४५१ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे १ लाख ४ हजार २७०.९६ चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहे. तसेच शहरातील विविध नाल्यांवरील २३ अतिक्रमणे हटविण्यात आली असून अंदाजे ८३९ चौरस मीटर क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाले, पथारीवाले आणि इतर अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात आली. या कालावधीत अशा एकूण ३४६ अतिक्रमणांचे निर्मूलन करण्यात आले.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाहता सर्वाधिक २२९ कारवाया क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत करण्यात आल्या. त्याखालोखाल इ क्षेत्रीय कार्यालयात १०३, ड क्षेत्रीय कार्यालयात १००, फ क्षेत्रीय कार्यालयात ९५, ब क्षेत्रीय कार्यालयात ९४, अ क्षेत्रीय कार्यालयात ८४, ग क्षेत्रीय कार्यालयात ६४ आणि ह क्षेत्रीय कार्यालयात ५१ कारवाया करण्यात आल्या.

शहरातील नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवणे, पावसाळ्यात पूरस्थिती टाळणे, सार्वजनिक रस्ते आणि पदपथ नागरिकांसाठी सुरक्षित व मोकळे ठेवणे तसेच अनधिकृत बांधकामांना आळा घालणे या उद्देशाने ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.महापालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना अनधिकृत बांधकामे आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांना प्रोत्साहन न देण्याचे तसेच शहर स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

“सार्वजनिक जागा, रस्ते, पदपथ आणि नाले हे नागरिकांच्या वापरासाठी असून त्यांच्यावर होणाऱ्या अतिक्रमणांमुळे नागरी सुविधा आणि सुरक्षिततेवर परिणाम होतो. त्यामुळे अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही शहर सुबक आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे.”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका*

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशून्य कचरा संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Next Article ४१२ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर संकलनाचा टप्पा पार
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?