हिंदवी न्यूज |आळंदी
श्री क्षेत्र आळंदी ब्रह्मवृंद अनुष्ठान मंडळाकडून माऊलींची पालखी दशमीला परत आल्यावर एकादशी पासून 3 दिवसीय यज्ञाचे अनुष्ठान केले जाते. या निमित्त ब्रम्हध्वज पुजनाने, लक्ष्मी नारायण यागाला प्रारंभ झाला. मंडळाच्या या 43 व्या वर्षी ‘ श्री लक्ष्मी नारायण’ यागाचे तीन दिवसीय यागाचे आयोजन करण्यात आले.
वे. मू. निखिल प्रसादे गुरुजी आणि वे. मू. चैतन्य जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘योगीराज मंगल कार्यालय’ येथे यज्ञ संपन्न झाला. पहिल्या दिवशी यज्ञाचा प्रारंभ, सायंकाळी ह. भ. प. चिदंबरेश्वर साखरे महाराज यांचे प्रवचन आणि सौ. विदुला व डॉ. सारंग (अप्पा) जोशी यांचे भक्तीपूर्ण गायन झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी हवन, दुपारी वेदसेवा आणि सायंकाळी सत्काराचा कार्यक्रम झाला. या वेळेस वे. मू. प्रकाशशास्त्री दंडगे गुरुजी, वे. मू. विवेक विश्वनाथशास्त्री जोशी, ज्येष्ठ नागरिक म्हणून शैलाताई व दत्तात्रय हरिभाऊ कुलकर्णी यांचा आणि नैपुण्य प्राप्त विद्यार्थी यांचे सत्कार झाले.
वे. मू. अशोकशास्त्री कुलकर्णी गुरुजी हे अध्यक्ष व वे. मू. अनंतशास्त्री मुळे प्रमुख पाहुणे लाभले. विश्वस्त बाळासाहेब पोफळे, यजमान प्रशांत मुळे तसेच अरविंद जोशी आणि संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते विविध सत्कार झाले. सूत्रसंचालन वे. मू. चितळे गुरुजी आणि कु. श्रावणी जोशी यांनी केले. तिसऱ्या दिवशी पूर्णाहुती झाल्यावर महाप्रसादाचे सेवन झाले. कार्यक्रमात आळंदीतील वेदपाठशाळेतील विद्यार्थी व गुरुजन उपस्थित होते.
यज्ञा साठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी चे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे (कबीरबुवा ) आणि पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या शुभेच्छा लाभल्या. समीर आणि श्रीरंग सुनील तुर्की यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. मंडळाचे अध्यक्ष वे. मू. चितळे गुरुजी, कार्याध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर जोशी, कोषाध्यक्ष बाळासाहेब पोफळे तसेच विश्वस्त विजय कुलकर्णी, मुरलीधर प्रसादे आणि चैतन्य जोशी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून यज्ञ उत्साहात संपन्न झाला.


