Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»मोशीमध्ये उद्योजकतेचा महाकुंभ! ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो २०२६’चे १५ ऑक्टोबरपासून आयोजन
पिंपरी चिंचवड

मोशीमध्ये उद्योजकतेचा महाकुंभ! ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो २०२६’चे १५ ऑक्टोबरपासून आयोजन

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

– १ हजारांहून अधिक स्टॉल्स, ५० पेक्षा जास्त व्यावसायिक क्षेत्रांचा सहभाग; शासन आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

हिंदवी न्यूज | पिंपरी 

मराठी उद्योजकांना व्यवसायवृद्धीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि उद्योगविश्वाला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC) येथे हा भव्य व्यावसायिक महोत्सव होणार आहे. या प्रदर्शनाची माहिती पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मराठा उद्योजक कक्षाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संजय वायाळ यांनी दिली.

यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन खामकर, सचिव रमेश पवार, विशेष उपस्थितीत मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, कार्यकारिणी सदस्य गणेश जाधव, डॉ. जयसिंग कदम, विकास नाणेकर, गणेश औताडे, पल्लवी बोरडे आणि सोनाली भोसले यांच्यासह पदाधिकारी, सदस्य या वेळी उपस्थित होते.

मराठा सेवा संघ प्रणीत मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था, पुणे यांच्या आयोजनातून होणाऱ्या या एक्स्पोमध्ये विविध उद्योग क्षेत्रांतील उद्योजक, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट प्रतिनिधींना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रदर्शनात एक हजारांहून अधिक स्टॉल्स आणि ५० पेक्षा जास्त व्यावसायिक क्षेत्रांचा सहभाग असणार आहे.

या एक्स्पोला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार, केंद्रीय आयुष राज्यमंत्री तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांची विशेष मान्यवर म्हणून उपस्थिती असणार आहे.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना आपली उत्पादने व सेवा सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच व्यावसायिक संपर्क वाढविणे, नवीन बाजारपेठांपर्यंत पोहोचणे, गुंतवणुकीच्या संधी शोधणे व विविध उद्योग क्षेत्रांमध्ये व्यावसायिक भागीदारी निर्माण करणे, यावर भर दिला जाणार आहे. मराठी उद्योजकांना स्थानिक बाजारपेठेपुरते मर्यादित न ठेवता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय विस्ताराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. नवउद्योजकांसह प्रस्थापित व्यावसायिकांनाही या प्रदर्शनातून नवे व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान,१५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान मोशी येथील PIECC येथे होणाऱ्या या प्रदर्शनात उद्योजक, व्यावसायिक आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले  आहे.

Global maratha business expo 2026
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; रक्तदान शिबिरासह विविध स्पर्धांनी कार्यक्रमात रंगत.
Next Article मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ह्युंडाई मोटर इंडिया’च्या पुणे प्लांटचे उद्घाटन
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 9, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे  माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?