हिंदवी न्यूज | पिंपरी
नवरात्रात नऊ रंगाच्या साड्या परिधान करण्याबरोबरच महिलांच्या आयुष्यात नवनवीन रंग भरावे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला कधीही कमी लेखू नये. तिच्या दिसण्यावर नाही तर तिच्या मनावर प्रेम करा. तिच्या चुका शोधण्यापेक्षा तिच्या स्वभावाला समजून घ्या. प्रत्येक प्रसंगात तिची साथ द्या. सन्मानाने वागवा. असा महत्त्वपूर्ण संदेश उपमहापौर सौ. शर्मिला बाबर यांनी शहरवासियांना दिला.
प्रत्येक स्त्री हसतमुख जगत असते, पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे ती अनेक दुःख लपवत असते. स्त्रीने स्वतःला कधीही कमजोर समजू नये. तुमच्या मध्ये दुर्गेचे धैर्य, लक्ष्मी ची समृद्धी आणि सरस्वतीचे ज्ञान आहे. ते घ्या. अन्यायाविरुद्ध लढा. सोबत इतर महिलांना पुढे घेउन जा. कारण सशक्त महिला सशक्त कुटुंब घडवतात, आणि सशक्त राष्ट्र घडवण्यात मोलाचे योगदान देतात. आणि राष्ट्र सशक्त असेल, समाज सशक्त असेल तर महिला देखील सशक्त व सुरक्षित राहतील.. असा विश्वास उपमहापौर शर्मिला बाबर यांनी व्यक्त केला…









