Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»‘पीएमआरडीए’त उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘फॅसिलिटेशन सेंटर’; परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ होणार!
पिंपरी चिंचवड

‘पीएमआरडीए’त उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘फॅसिलिटेशन सेंटर’; परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ होणार!

औद्योगिक प्रस्तावांच्या कार्यवाहीला गती देण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचा निर्णय
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 18, 2026Updated:October 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

-औद्योगिक संघटनांसोबतच्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा

हिंदवी न्यूज|पिंपरी
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील औद्योगिक विकासाला गती देण्यासह उद्योजकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी ‘पीएमआरडीए’च्या वतीने विशेष ‘फॅसिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे औद्योगिक प्रस्तावांवरील कार्यवाही अधिक गतिमान, सुलभ आणि पारदर्शक होणार आहे.

डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ‘पीएमआरडीए’च्या आकुर्डी येथील मुख्यालयात औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंगळवारी (दि. १३) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, संबंधित विभागांचे प्रमुख व अधिकारी, तसेच चाकण, हिंजवडी, रांजणगाव, तळेगाव, पिरंगुट आणि इतर औद्योगिक क्षेत्रांतील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विकास परवानगी, फायर एनओसी, बीपीएमएस प्रणालीतील अडचणी, शुल्क आकारणी, आवश्यक कागदपत्रे, झोनिंग ओपिनियन व विविध प्रलंबित औद्योगिक प्रस्तावांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. औद्योगिक प्रस्तावांवरील कार्यवाही अधिक पारदर्शक करण्यासाठी १०० टक्के ऑनलाइन बीपीएमएस प्रणालीद्वारेच प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. बीपीएमएस प्रक्रियेदरम्यान उद्योजक आणि वास्तुविशारदांना येणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी ‘पीएमआरडीए’चे अधिकारी आणि बीपीएमएस प्रतिनिधी यांच्या समन्वयातून ‘फॅसिलिटेशन सेंटर’ कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच, शुल्काचा तपशील, आवश्यक कागदपत्रांची यादी व इतर महत्त्वाची माहिती औद्योगिक संघटनांना उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही महानगर आयुक्तांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

औद्योगिक क्षेत्रांतील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव याकडे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. प्राधान्याने सुधारणा करावयाच्या रस्त्यांची यादी औद्योगिक संघटनांकडून मागविण्यात आली आहे. तसेच, अवजड वाहनांसाठी ‘ट्रक टर्मिनस’ उभारणे आणि औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी आवश्यक जागा निश्चित करण्याचे निर्देशही महानगर आयुक्तांनी या बैठकीत दिले.

‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील औद्योगिक विकासाला चालना देणे, उद्योजकांना अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे आणि परवानगी प्रक्रिया अधिक जलद, सुलभ व पारदर्शक करणे हा’पीएमआरडीए’चा उद्देश आहे. ‘फॅसिलिटेशन सेंटर’च्या माध्यमातून उद्योजकांच्या प्रश्नांचे प्रभावी निराकरण होऊन औद्योगिक क्षेत्रातील विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार आहे.

Pmrda fecilitation centre
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी कलाकारांकडून दि. २५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन
Next Article मुलांना ‘विंग्ज ऑफ फायर’ वाचायला द्या, मोठी स्वप्ने पाहण्यास सांगा!
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 9, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे  माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?