Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»मुलांना ‘विंग्ज ऑफ फायर’ वाचायला द्या, मोठी स्वप्ने पाहण्यास सांगा!
पिंपरी चिंचवड

मुलांना ‘विंग्ज ऑफ फायर’ वाचायला द्या, मोठी स्वप्ने पाहण्यास सांगा!

पीएमआरडीए'च्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांचे प्रतिपादन
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love


– डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘पीएमआरडीए’त अभिवादन

हिंदवी न्यूज | पिंपरी
भारताचे माजी राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन’, महान शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना पीएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी, “मुलांच्या हातात ‘विंग्ज ऑफ फायर’ हे पुस्तक द्या आणि त्यांना मोठी स्वप्ने पाहायला सांगा. हीच डॉ. कलाम यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे प्रतिपादन केले.

अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, राष्ट्रासाठी किती समर्पित भावनेने काम करता येते, हे डॉ. कलाम यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले. रामेश्वरम येथील एका सामान्य कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास इस्रो आणि डीआरडीओमधील कार्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला. हा प्रवास प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. वृत्तपत्रे विकण्यापासून ते भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यापर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास जिद्द आणि परिश्रमांच्या जोरावर माणूस कोणत्याही उंचीवर पोहोचू शकतो, हे सिद्ध करतो.

या कार्यक्रमास ‘पीएमआरडीए’च्या सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, अधीक्षक अभियंता अनिल सगर, उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे, भूमिअभिलेख विभागाच्या अधीक्षिका आशा जाधव, कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल, उपअभियंता डी. एम. चौरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांच्यासह ‘पीएमआरडीए’चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘त्या’ उपक्रमाची के. मंजुलक्ष्मी यांनी जागवली आठवण!*

याप्रसंगी अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक व आयुक्त म्हणून कार्यरत असताना राबविण्यात आलेल्या एका विशेष उपक्रमाची आठवण उपस्थितांना सांगितली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमधील शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या २५ गुणवंत विद्यार्थ्यांनी अभ्यास सहलीसाठी थेट विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे भरारी घेतली होती. कोल्हापूर महानगरपालिकेचा हा उपक्रम गुणवंत विद्यार्थ्यांना देशातील अग्रगण्य वैज्ञानिक संस्थेचा प्रत्यक्ष अनुभव देणारा आणि त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरला. के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत होता. सातत्याने असा उपक्रम राबविणारी कोल्हापूर ही राज्यातील एकमेव महानगरपालिका ठरली होती. या उपक्रमामुळे गोरगरीब, परंतु गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. डॉ. कलाम यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊनच हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Dr apj abdul kalam
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘पीएमआरडीए’त उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘फॅसिलिटेशन सेंटर’; परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ होणार!
Next Article हिंदवी न्यूज प्रस्तुत नवरात्री विशेष ” नवदुर्गा” मालिकेत सौ शर्मिला राजेंद्र बाबर, उपमहापौर (पिं. चिं. महानगरपालिका) यांचा विशेष संदेश…
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 9, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे  माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?