https://youtube.com/shorts/WvVC1HcS8fo?si=IkdZawoZhLo23gzI
हिंदवी न्यूज | पिंपरी
नवरात्र म्हणजे देवीच्या विविध रूपांचे आराधना. स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा आणि महिलांच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा हा उत्सव आहे. आजच्या काळात नवरात्र केवळ धार्मिक उत्सव न राहता, स्त्रीशक्तीचा जागर करण्याचे माध्यम बनले आहे.
विविध उपक्रम राबवून आणि यानिमित्ताने समाजाला जागरूक करण्याचा संदेश या निमित्ताने दिला जातो. महिलांचे स्थान नेहमीच उच्च असले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातदेखील महिलांना माता-देवीसमान मानले जात होते
आजच्या काळात महिलांनी महिलांना सहकार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सामाजिक चळवळ असो, विविध क्षेत्रांतील योगदान असो किंवा नेतृत्वाची जबाबदारी असो, महिला प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. राजकारण, प्रशासन, वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रातही महिला नेतृत्व करून समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत आहेत.
आजच्या काळात महिला केवळ स्वतःची प्रगती करत नाहीत, तर समाजालाही विकासाच्या दिशेने घेऊन जात आहेत. देशाच्या राष्ट्रपती पदापासून विविध महत्त्वाच्या पदांपर्यंत महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. हे खरोखरच अभिमानास्पद आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आपण सर्वांनी महिलांचा सन्मान करावा,त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन द्यावे आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून द्याव्यात. महिलांनीही आत्मविश्वासाने पुढे येऊन आपल्या क्षमतेचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करावा.
स्त्रीशक्तीचा सन्मान, महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना प्रगतीच्या समान संधी देणे हीच काळाची गरज आहे.









