Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

November 14, 2026

आळंदीतील भराव रस्त्यावर गाड्या थेट माऊली मंदिरासमोर, भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

November 14, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘स्व. नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा!

November 14, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»नगरसेवक स्वेच्छा निधीतून विकासकामे करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
पिंपरी चिंचवड

नगरसेवक स्वेच्छा निधीतून विकासकामे करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

निधीचा विनियोग करताना नागरी सुविधांच्या कामांना प्राधान्य; प्रशासकीय व आर्थिक मान्यतेसाठी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील प्रभागस्तरावर स्थानिक, तातडीच्या आणि नागरी हिताच्या पायाभूत विकासकामांना गती देण्यासाठी नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगाबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. महापालिकेच्या लेखा व वित्त विभागामार्फत यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले असून, निधीचा वापर करताना कामांचे महत्त्व, तातडी आणि नागरिकांना होणारा लाभ विचारात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नगरसेवक स्वेच्छा निधीतून कामे सुचविताना एकत्रित मोठे काम, एकाच प्रभागातील विविध ठिकाणी लहान कामे किंवा बहुसदस्यीय प्रभागात एकत्रितपणे मोठे काम अशा पर्यायांचा विचार करता येणार आहे. संबंधित कामांसाठी अर्थसंकल्पात प्रत्येक नगरसेवकासाठी मंजूर असलेल्या निधीच्या मर्यादेतच खर्च करता येईल. एकापेक्षा अधिक नगरसेवकांना एकत्रित काम करावयाचे असल्यास निधीचे एकत्रीकरण सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने करता येणार आहे.

प्रशासकीय व आर्थिक मान्यतेची कार्यपद्धती

नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यापूर्वी आवश्यक प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक असेल. २५ लाख रुपयांपर्यंतच्या प्रस्तावांना नियमानुसार अतिरिक्त आयुक्तांकडून प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची तरतूद आहे. २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावांसाठी स्थायी समितीची पूर्वमान्यता आवश्यक राहील. संबंधित विभागांनी विहित कार्यपद्धती नुसार पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरी सुविधांच्या कामांना प्राधान्य

या निधीतून रस्ते, लहान पूल, पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, गटारे, समाजमंदिरे, सार्वजनिक वाचनालये, प्राथमिक शाळांमधील आवश्यक दुरुस्ती, सार्वजनिक उपयोगाच्या सुविधा, उद्याने, मनपाच्या जागांवरील खेळणी व व्यायाम साहित्य, पादचारी सुविधा तसेच इतर आवश्यक नागरी कामे करता येणार आहेत. याशिवाय सार्वजनिक शौचालये, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, स्मशानभूमीतील मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित कामांचाही समावेश आहे.

मात्र, मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केलेल्या मर्यादेनुसार खासगी इमारतींची दुरुस्ती, अनधिकृत वस्त्यांमधील कामे, अनुदानित संस्थांची काही कामे, मोठ्या स्वरूपाची स्वतंत्र बांधकामे आणि स्वेच्छा निधीच्या उद्देशाशी सुसंगत नसलेली कामे या निधीतून करता येणार नाहीत. काही विशिष्ट कामांसाठी स्वतंत्र अटी व निर्बंधही नमूद करण्यात आले आहेत.

निधीच्या वापरात नियमांचे पालन करण्याचे निर्देश

*नगरसेवक स्वेच्छा निधीतील कामे सुचविताना संबंधित नगरसेवकांची लेखी शिफारस, आवश्यक प्रशासकीय व वित्तीय मान्यता आणि विहित कार्यपद्धतीचे पालन करणे आवश्यक राहील. शासन निर्णय व परिपत्रकातील तरतुदींनुसार निधीचा विनियोग करून नागरी सुविधांशी संबंधित कामांची प्रभावी अंमलबजावणी करावी*, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

guidelines-development-works-corporators-discretionary-fund
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही भेटवस्तू स्वीकारू नयेत
Next Article पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ नोव्हेंबरला पुणे मेट्रो लाईन-३ चे ऑनलाइन लोकार्पण
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘स्व. नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा!

November 14, 2026

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
आळंदी

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 14, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | आळंदी  मौजे पिंपळगाव गोलेगाव येथे उपवनसंरक्षक जुन्नर, मा. सहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर, व मा.…

आळंदीतील भराव रस्त्यावर गाड्या थेट माऊली मंदिरासमोर, भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

November 14, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘स्व. नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा!

November 14, 2026

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?