Author: Hindavinewsnetwork@gmail.com

पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने दापोडी येथील आनंदवन झिरो वेस्ट प्रकल्पात आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल,  सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली  शून्य कचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे चार प्रकारे विलगीकरण, सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदी, कापडी पिशव्यांचा वापर, ‘आर.आर.आर. सेंटर’ची संकल्पना तसेच घरगुती कंपोस्टिंग यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर  सादरीकरण करण्यात आले. उपस्थितांना दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्पाची सविस्तर माहिती देत कचरा…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज) – छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे  यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, जाधववाडी  येथे  रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  शिबीरात एकूण ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र, महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. जनसेवा बल्ड बँकेच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास शिवभक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.‎  यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका विधी समिती सभापती सुजाता  बोराटे, सामाजिक कार्यकर्ते राजू भुजबळ, छावा वाहन चालक-मालक कामगार संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण शेलार, कार्याध्यक्ष हिरामण गवारी, सहसचिव रवींद्र लंके आदी उपस्थित होते. मंडळाचे कार्यकर्ते विनायक ढोबळे, निलेश गायकवाड, रमेश निकम, ऋषिकेश…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज ) –  छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळाच्या वतीने जाधववाडी येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांची  ३९६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले शिवनेरी ते जाधववाडी येथे  शिवज्योत आणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व मावळे यांची वेशभूषा परिधान करुन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी जाधववाडी सीएनजी पंप, मातोश्री कमान, आहेरवाडी चौक, मधला पेठा रोड ते साई पॅलेसमार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील महीलांसह नागरिकांनी शिवज्योत व पालखीचे स्वागत केले.  फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.  जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.…

Read More

पिंपरी (हिंदवी न्यूज) :  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यात सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांचे  मोलाचे योगदान आहे. कोणत्याही पदावर कार्य केले असले तरी प्रत्येक कर्मचाऱ्याचा अनुभव, त्यांची कार्यनिष्ठा आणि जबाबदारीची जाणीव यामुळेच महापालिकेला आज नावलौकिक प्राप्त झाला आहे. सेवानिवृत्ती हा शेवट नसून आयुष्याचा एक नवा टप्पा आहे. या काळात आपण आपल्या कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवावा, आरोग्याची काळजी घ्यावी आणि आपल्या आवडी-निवडी, छंद जोपासत आनंदी व समाधानकारक आयुष्य जगावे, असे प्रतिपादन सह आयुक्त मनोज लोणकर यांनी केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मुख्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात सत्कार सोहळा पार पडला. यावेळी मार्च २०२६ अखेर  सेवानिवृत्त होणाऱ्या २३ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ३ अशा…

Read More

पिंपरी (हिंदवी न्यूज) :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत  शहरातील विविध विकासकामे व विभागनिहाय प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते.          यावेळी स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, शीतल वर्णेकर, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.          बैठकीत शहरातील विविध विकासकामांशी संबंधित प्रस्तावांवर चर्चा…

Read More

पिंपरी (हिंदवी न्यूज) : प्रणाली प्रकाशन आणि न्यू इंग्लिश स्कूल, माण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ( दि. २७ मार्च) रोजी न्यू इंग्लिश स्कूल, माण विद्यालयात लेखिका कल्पना चांदमल बंब यांच्या ‘शब्दांशी जोडले नाते’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कु. मिसबाह शफिक खान ( इयत्ता ११ वी) होत्या. प्रमुख अतिथी कु. रेश्मा राकेश प्रजापती ( इयत्ता ११ वी), कु. अर्पिता भाऊराव पवार ( इयत्ता ९ वी )  या विद्यार्थ्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रणाली प्रकाशनच्या शामला पंडित – दीक्षित, न्यू इंग्लिश स्कूल, माण  विद्यालयाचे मुख्याध्यापक  अंबादास रोडे, ज्येष्ठ साहित्यिक नारायण कुंभार, लेखिका कल्पना बंब तसेच…

Read More

पिंपरी (हिंदवी न्यूज) : दिव्यांग बांधवांसाठी उभारण्यात आलेले दिव्यांग भवन हे केवळ सुविधा केंद्र नसून त्यांना सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगण्यासाठीचा भक्कम आधार ठरत आहे. येथे उपलब्ध  असलेल्या सोयी-सुविधा व फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. मोरवाडी येथील दिव्यांग भवन येथे महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या संचालक मंडळाची बैठक  पार पडली. यावेळी ते बोलत होते.  बैठकीला विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, मुख्य कार्यकारी…

Read More

पिंपरी (हिंदवी न्यूज)  :  पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत ज्या विकसकांनी फ्लॅटधारकांना ताबा देण्यापूर्वी पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारत लेखी हमीपत्र दिले आहे, त्यांनी ती जबाबदारी काटेकोरपणे पार पाडणे बंधनकारक आहे. संबंधित जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यास किंवा पाणीपुरवठ्याचा अन्यायकारक आर्थिक भार सोसायट्यांवर टाकल्यास महापालिका संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करेल, असा  इशारा पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला. मुंबई उच्च न्यायालयातील १० एप्रिल २०२३ रोजीच्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने पाणीपुरवठ्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सह शहर…

Read More

पथनाट्यातून  जनजागृती. पिंपळे गुरव (हिंदवी न्यूज) : पिंपळे गुरव येथील दिलासा संस्था, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या सेवाभावी संस्थांच्या वतीने  येथील राजमाता  जिजाऊ उद्यानात  जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी पथनाटया द्वारे  पाणी वाचवा, पाणी म्हणजे श्वास ,जगण्याचा विश्वास , पाणी जपून वापरा असा संदेश देउन जनजागृती करण्यात आली. पथनाट्यात भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे, सौ,वैशाली चौधरी,दिलासा संस्थेचे नंदकुमार कांबळे सहभागी झाले होते. या प्रसंगी  दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी ” पाणी हे सर्व जीवसृष्टीसाठी पृथ्वीवरील अमृत…

Read More

पिंपरी (हिंदवी न्यूज)  पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठांचा अनुभव, त्यांची जिद्द व समाजाशी असलेली नाळ ही आपल्या शहराची मौल्यवान ताकद आहे, तर लहान मुलांचा उत्साह, गुणवत्ता आणि नवे विक्रम घडविण्याची क्षमता हे शहराच्या उज्ज्वल भविष्याचे आश्वासन आहे. एका बाजूला आयुष्यभर शिस्त, सातत्य आणि चिकाटी जपणारे ज्येष्ठ, तर दुसऱ्या बाजूला क्रीडा, बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर मोठी स्वप्ने साकार करणारी आपली मुले, हा पिंपरी चिंचवडचा सर्वात प्रेरणादायी चेहरा आहे. अशा व्यक्तींचा सन्मान म्हणजे केवळ त्यांच्या यशाचा गौरव नसून, संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारा व नव्या पिढीला दिशा देणारा संदेश आहे. आपल्या शहरातील प्रत्येक गुणवंताला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका नेहमीच कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन महापौर रवि…

Read More