Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»क्रीडा»ज्येष्ठ मंडळींकडे असलेली जिद्द,सातत्य,त्यांचे अनुभव, आणि समाजाशी असलेली नाळ भावी  पिढ्यांसाठी मार्गदर्शक – महापौर रवि लांडगे
क्रीडा

ज्येष्ठ मंडळींकडे असलेली जिद्द,सातत्य,त्यांचे अनुभव, आणि समाजाशी असलेली नाळ भावी  पिढ्यांसाठी मार्गदर्शक – महापौर रवि लांडगे

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMarch 28, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
सन्मान
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
पिंपरी (हिंदवी न्यूज) 
पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठांचा अनुभव, त्यांची जिद्द व समाजाशी असलेली नाळ ही आपल्या शहराची मौल्यवान ताकद आहे, तर लहान मुलांचा उत्साह, गुणवत्ता आणि नवे विक्रम घडविण्याची क्षमता हे शहराच्या उज्ज्वल भविष्याचे आश्वासन आहे. एका बाजूला आयुष्यभर शिस्त, सातत्य आणि चिकाटी जपणारे ज्येष्ठ, तर दुसऱ्या बाजूला क्रीडा, बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर मोठी स्वप्ने साकार करणारी आपली मुले, हा पिंपरी चिंचवडचा सर्वात प्रेरणादायी चेहरा आहे. अशा व्यक्तींचा सन्मान म्हणजे केवळ त्यांच्या यशाचा गौरव नसून, संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारा व नव्या पिढीला दिशा देणारा संदेश आहे. आपल्या शहरातील प्रत्येक गुणवंताला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका नेहमीच कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
    नुकत्याच झालेल्या पुणे सायकल ग्रँड टूर स्पर्धेच्या निमित्ताने चर्चेत असलेले भोसरी येथील ८४ वर्षाचे प्रसिद्ध सायकलपटू अशोक विष्णुपंत बेलापूरकर तसेच लॉन टेनिस राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारा मनपा शाळेतील विद्यार्थी राम मुगदुस, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये २ मिनिटे ४ सेकंदात १९५ देशांचे झेंडे ओळखण्याचा विक्रम नोंदविणाऱ्या ५ वर्षीय तेजस जोशी यांचा  महापालिकेच्या दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात  महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
 या सत्कार सोहळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे यांच्यासह उपायुक्त पंकज पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
 पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर यांनी ३५ वर्षापूर्वी बेलापूरकर यांची सायकलची आवड पाहून त्यांना सायकल भेट दिली होती. तीच सायकल ते आत्तापर्यंत वापरत होते सायकलवरून गेल्या ७० वर्षात लाखो किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला आहे. वारकरी असलेल्या बेलापूरकर यांनी सायकलवरून आळंदी ते पंढरपूर अशी अनेक वर्ष वारी केली आहे तसेच विविध राज्यांचा प्रवास देखील त्यांनी सायकलवर केला आहे, याशिवाय ते “सायकल चालवा -पर्यावरण वाचवा”  आणि “झाडे लावा – झाडे जगवा” अशा सामाजिक कार्याचाही प्रचार करतात, अशी माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली.
 महापौर रवि लांडगे यांनी दिलेली सायकल यापुढील आयुष्यात वापरणार आहे, अशा भावना बेलापूरकर यांनी सत्कारास उत्तर देताना व्यक्त केल्या.

  • विविध क्षेत्रातील खेळाडूंचेही सत्कार
लॉन टेनिस राज्यस्तरीय स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील माध्यमिक विद्यालय केशवनगर शाळेचा इ. १० वीचा विद्यार्थी राम विक्रम मुगदुस याने प्रथम क्रमांक प्राप्त केला.  दिल्ली येथे होणाऱ्या १७ वर्षाखालील लॉन टेनिस च्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देखील तो सहभागी होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील रावेत येथील अवघ्या ५ वर्ष २ महिन्याचा तेजस जोशी याने इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये २ मिनिटे ४ सेकंदात १९५ देशांचे झेंडे ओळखण्याचा विक्रम नोंदवून शहराच्या नावलौकिकात भर पाडली आहे, यासाठी त्यांचे आई वडील रेखा व नीलम जोशी यांनी त्याला मार्गदर्शन केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते भरत खंडू आडसूळ यांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी दुर्घटनाग्रस्त आणि कोरोना काळातील मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सामाजिक बांधिलकीतून आर्थिक मदत केली आहे.
या सर्वांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
झाडे लावा – झाडे जगवा”* तसेच *”सायकल चालवा-पर्यावरण वाचवा”* यासारख्या सामाजिक कार्याचा प्रचार व प्रसार करणा-या ८४ वर्षांच्या सायकलपटूस महापौर यांच्या हस्ते सायकल भेट देऊन सत्कार करण्यात आला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleक्रीडा,कला,साहित्य व सांस्कृतिक समितीच्या बैठकीत महापौरांच्या हस्ते कलाकार, खेळाडू व साहित्यिकांचा सन्मान करण्याचा ठराव मंजूर.
Next Article जागतिक जलदिना निमित्त पाणी बचतीचा संदेश
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे… ‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’

August 23, 2026

सायन्स पार्कमध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन उत्साहात

August 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 25, 20260
Spread the love

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या समाजसेवा प्रभागातर्फे विश्वबंधुत्व दिनानिमित्त देशव्यापी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे… ‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?