Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»महापालिकेची १ जुलैपासून विशेष मालमत्ता कर वसुली मोहीम
पिंपरी चिंचवड

महापालिकेची १ जुलैपासून विशेष मालमत्ता कर वसुली मोहीम

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 21, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

३० जूनपर्यंत १० टक्के सवलतीचा घेता येणार लाभ, त्यानंतर थकबाकीदारांवर कठोर कारवाई

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागामार्फत चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी १ जुलै २०२६ पासून मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांना बिल वाटपासोबत जप्तीपूर्व नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही कर भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. यामध्ये निवासी मालमत्तांचे पाणीपुरवठा कनेक्शन खंडित करणे तसेच व्यावसायिक आणि बिगरनिवासी मालमत्तांवर जप्तीची मोहीम राबविण्यात येणार आहे.

महापालिकेकडून मालमत्ताधारकांना ३० जून २०२६ पर्यंत संपूर्ण मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने भरल्यास सामान्य करावर १० टक्के सवलत दिली आहे. याशिवाय पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी विविध प्रोत्साहनपर सवलतींचीही तरतूद करण्यात आली आहे. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने नागरिकांनी विलंब न करता कर भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी १ जुलैपासून सर्व विभागीय कार्यालयांमध्ये विशेष वसुली पथके तयार करण्यात येणार असून, मोठ्या थकबाकीदारांकडून वसुलीवर विशेष भर दिला जाणार आहे. वारंवार आवाहन करूनही कर भरणा न करणाऱ्या निवासी मालमत्तांचे पाणीपुरवठा कनेक्शन खंडित करणे, तसेच व्यावसायिक व बिगरनिवासी मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेने कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीपर्यंत प्रतीक्षा न करता त्वरित कराचा भरणा करून ३० जून २०२६ पर्यंत उपलब्ध असलेल्या सवलतींचा लाभ घ्यावा. तसेच जप्ती आणि दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाने केले आहे.

 

३५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांना दिली नोटीस

महापालिकेच्या हद्दीत एकूण ७ लाख ४४ हजार ६०३ मालमत्तांची नोंद असून, १७ जून २०२६ अखेरपर्यंत सुमारे ३७० कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. आतापर्यंत ३ लाख ३९ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. वसुली मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शहरातील थकबाकीदारांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला असून, ३५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस प्राप्त होऊनही कर न भरलेल्या मालमत्तांवर महापालिकेकडून कोणत्याही वेळी जप्तीची कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती कर संकलन व कर आकारणी विभागातून देण्यात आली आहे.

 

🗣💬महापालिकेने मालमत्ताधारकांना ३० जूनपर्यंत १० टक्के सवलतीची विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे. या कालावधीत कर भरणाऱ्या नागरिकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. मात्र, वारंवार आवाहन करूनही कर भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांवर १ जुलैपासून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता तात्काळ मालमत्ता कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा आणि कारवाई टाळावी.

–रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका

–

🗣💬शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मालमत्ता कराचे उत्पन्न अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी दिलेला कर हा विकासकामांसाठी थेट उपयोगात येतो. त्यामुळे मालमत्ताधारकांनी उपलब्ध सवलतींचा लाभ घेत ३० जून २०२६ पूर्वी कर भरणा करावा. कर भरण्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून शहराच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा. मुदत संपल्यानंतर थकीत करावरील वसुली आणि कायदेशीर कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल.

–डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेच्या पुढाकारातून लोंढे चाळ परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत.
Next Article स्थायी समिती सभेत जलनिस्सारण व्यवस्था सुधारणा, रस्ते विकास, आरोग्य सुविधा, स्वच्छता अभियान व स्मार्ट सिटी प्रकल्पांसह विविध विकासकामांना मंजुरी
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?