Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

October 11, 2026

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»शहरातील ११२३ केंद्रांवर २ लाख २७ हजार ९५३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस
पिंपरी चिंचवड

शहरातील ११२३ केंद्रांवर २ लाख २७ हजार ९५३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 1, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (हिंदवी न्यूज) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा विविध रुग्णालय व दवाखान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी श्रीम. इंदिरा गांधी प्रसूती रुग्णालय सांगवी येथे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते, ह.भ.प. मल्हारराव कुटे रुग्णालय आकुर्डी येथे उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते तसेच तालेरा रुग्णालयात आमदार उमा खापरे ,स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. भोसरी रुग्णालय येथे महिला व बालकल्याण समिती सभापती राणीताई पठारे, नगरसदस्या सोनाली गव्हाणे, नगरसदस्य विराज लांडे, ॲड. नितीन लांडगे, माजी नगरसदस्या भीमाताई फुगे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या व वायसीएम रुग्णालयात माजी महापौर योगेश बहल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याशिवाय महापालिकेच्या इतर रुग्णालये व दवाखान्यांमध्ये स्थानिक माननीय नगरसदस्य व नगरसदस्या यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेच्या माध्यमातून ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन पोलिओमुक्त आणि निरोगी भारत घडविण्याचा संकल्प करण्यात आला.

सदर मोहीम यशस्वीपणे पार पडण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहा. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, महाराष्ट्र शासन पुणे विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. राजश्री ढवळे, सहा. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलवडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. शिवाजी ढगे, डॉ. ऋतुजा लोखंडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागांचे अधिकारी, एएनएम, एमपीडब्ल्यू, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व वैद्यकीय विभागाचे इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी पालकांशी संवाद साधत ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देण्याचे महत्त्व विषद केले. यापूर्वी पोलिओचे नियमित डोस घेतले असले, तरी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत पोलिओचे दोन थेंब देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

*११२३ केंद्रांवर २ लाख २७ हजार ९५३ बालकांचे पोलिओ लसीकरण* 

सदर मोहीम शहरातील ११२३ पोलिओ लसीकरण केंद्रांवर यशस्वीपणे राबविण्यात आली. महानगरपालिका दवाखाने, रुग्णालये, अंगणवाडी केंद्रे, बस स्थानके, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके तसेच फिरत्या लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस दिले. या मोहिमेत ० ते ५ वर्षांखालील २,२७,९५३ बालकांना, तसेच ५ वर्षांवरील ३,६८३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले.

ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४५५२ लसीकरण कर्मचारी कार्यरत होते. याशिवाय एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला आरोग्य समिती सदस्य, रोटरी क्लबचे स्वयंसेवक आणि इतर स्वयंसेवी संस्थांनीही मोलाचे योगदान दिले.

ज्या पालकांना आज आपल्या बालकाला पोलिओचा डोस देता आला नाही, त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या ० ते ५ वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणार आहेत. नागरिकांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्या बालकाचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

…..

“प्रत्येक पालकाने आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत. आपल्या एका छोट्याशा कृतीतून बालकांचे भविष्य सुरक्षित होईल आणि पोलिओमुक्त भारताचे स्वप्न अधिक बळकट होईल. ज्या पालकांना आज आपल्या बालकाला पोलिओचा डोस देता आला नाही, त्यांनी दि. २९ जून ते ३ जुलैदरम्यान घरभेटीस येणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आपल्या बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजून घ्यावेत.”

– कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

“राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम ही प्रत्येक बालकाच्या निरोगी भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शहरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी महापालिकेने व्यापक व्यवस्था केली आहे. ज्या पालकांचे बालक आज लसीकरणापासून वंचित राहिले असेल, त्यांनी आरोग्य कर्मचारी घरभेटीला आल्यानंतर पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य द्यावेत आणि या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.”

– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहरात ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न
Next Article पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून जून २०२६ अखेर ५७ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
आळंदी

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी  सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चार शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचे…

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?