Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगण्यासाठी दिव्यांग भवन ठरत आहे भक्कम आधार – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड

दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगण्यासाठी दिव्यांग भवन ठरत आहे भक्कम आधार – महापौर रवि लांडगे

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMarch 30, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

 

 

 

पिंपरी (हिंदवी न्यूज) : दिव्यांग बांधवांसाठी उभारण्यात आलेले दिव्यांग भवन हे केवळ सुविधा केंद्र नसून त्यांना सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगण्यासाठीचा भक्कम आधार ठरत आहे. येथे उपलब्ध  असलेल्या सोयी-सुविधा व फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

मोरवाडी येथील दिव्यांग भवन येथे महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या संचालक मंडळाची बैठक  पार पडली. यावेळी ते बोलत होते.  बैठकीला विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, सचिव गिरीश परळीकर, सल्लागार अभिजीत मुरुगकर, विजय कान्हेकर, प्रशासकीय अधिकारी पूजा भापकर तसेच सीएसआर सेलच्या श्रुतिका मुंगी आदी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, “दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केवळ पायाभूत सुविधा उभारणे पुरेसे नाही, तर त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. दिव्यांग भवनाच्या माध्यमातून शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासाच्या अधिकाधिक संधी निर्माण करून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.” तसेच दिव्यांगांसाठी उपलब्ध सुविधा अधिक व्यापक करण्यासोबतच कौशल्य विकास आणि जनजागृती उपक्रमांना गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी दिव्यांगांच्या समस्या समजून घेऊन करण्यात येणारे हे कार्य ही मोठी समाजसेवा असल्याचे नमूद केले. दिव्यांग बांधवांना सक्षम करण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिव्यांगांच्या सिंगल पॅरेंट्ससाठी विशेष उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त केली. तसेच दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिव्यांगांसाठी अधिक प्रभावी सुविधा निर्माण करण्याबाबत सूचना मांडल्या. यामध्ये हायड्रोथेरपीसाठी स्वतंत्र सुविधा आणि फिजिओथेरपी केंद्र उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान दिव्यांगांसाठी उपलब्ध सुविधांचा विस्तार, नव्या उपक्रमांची अंमलबजावणी आणि पायाभूत सुविधांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी दिव्यांग भवनच्या कार्याचा सविस्तर आढावा सादर केला. यात इमारतीचा आराखडा, विविध उपक्रम, जनजागृती मोहिमा, कौशल्य विकास कार्यक्रम तसेच ‘पर्पल जल्लोष’ या दिव्यांग महोत्सवाबाबत माहिती देण्यात आली

Loading

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleहमीपत्र दिलेल्या विकसकांनी फ्लॅटधारकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पार न पाडल्यास कठोर कारवाई  : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Next Article शब्दांशी जोडले नाते’
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

भाजपा शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 20260
Spread the love

विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर…

Loading

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?