Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»शहरातील विकासकामांना स्थायी समितीची गती
पिंपरी चिंचवड

शहरातील विकासकामांना स्थायी समितीची गती

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comApril 2, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
विकासकामांना मंजूरी
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी (हिंदवी न्यूज) :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत  शहरातील विविध विकासकामे व विभागनिहाय प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते.
         यावेळी स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, शीतल वर्णेकर, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
         बैठकीत शहरातील विविध विकासकामांशी संबंधित प्रस्तावांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. यामध्ये पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयातील विद्युत देखभाल व दुरुस्ती कामांसाठी खर्चास मान्यता देण्यात आली. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शाळा, इमारती व कार्यालयांमधील हमी कालावधी संपलेले नादुरुस्त इन्व्हर्टर व बॅटरी बदलणे, आवश्यकतेनुसार नवीन इन्व्हर्टर बसविणे व संबंधित कामांसाठी खर्चास मंजुरी देण्यात आली.
         भोसरी (मौजे कासारवाडी) येथील स. नं. ४९८ मधील मंजूर विकास योजनेनुसार प्रस्तावित १२ मीटर रस्त्यासाठी भूसंपादन करण्यास मान्यता देण्यात आली. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील १६०० किलोवॅट क्षमतेच्या रोहित्र संच व ब्रेकर्सच्या देखभाल-दुरुस्ती व संबंधित कामांसाठीही खर्च मंजूर करण्यात आला.  सेक्टर १० येथे पर्यायी ट्रान्सफॉर्मर व आरएमयू युनिट बसविण्यास मंजुरी देण्यात आली.  याशिवाय, विविध पंपिंग हाऊस येथे सॉफ्ट स्टार्टर बसविणे, झोपडपट्टीधारकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी चिंचवड (सर्व्हे नं. २९/२) येथील सुमारे ३० हजार चौ. फुट जागा संक्रमण शिबिरासाठी ३ वर्षे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ६ मधील पाणीपुरवठा ट्रेंचेसचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे तसेच पेव्हिंग ब्लॉक दुरुस्ती करणे यांसारख्या कामांना मंजुरी देण्यात आली.
थेरगाव गावठाण पंप हाऊस येथील पंपाची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक विद्युत कामे, तसेच पुणे महानगर परिवहन मंडळाच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील संचलन तुटीच्या लेखापरीक्षण अहवालाच्या अवलोकनासाठी खर्चासही मान्यता देण्यात आली.
वैद्यकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १९ टाटा सुमो अथवा तत्सम वाहने २ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच प्रभाग क्र. ८ मधील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉग शेड परिसरातील किरकोळ स्थापत्य दुरुस्ती, विविध कार्यक्रमांसाठी मंडप व्यवस्था, प्रभाग क्र. ९ व २ मधील स्वच्छतागृह दुरुस्ती, तसेच मासुळकर कॉलनी, यशवंतनगर आदी भागांतील दुरुस्ती कामांसाठीही खर्चास मान्यता देण्यात आली.  निगडी सेक्टर २३ येथील उद्यानातील स्थापत्य कामे, कासारवाडी येथील मैलाशुद्धीकरण केंद्रासाठी सीमाभिंत बांधकाम, तसेच सांगवी-किवळे रस्त्यावरील बस थांब्यांची देखभाल व दुरुस्ती यांसारख्या कामांनाही स्थायी समितीने मंजुरी दिली.
​”पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आजच्या स्थायी समिती बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. प्रामुख्याने आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण, पाणीपुरवठा यंत्रणेतील तांत्रिक सुधारणा आणि प्रलंबित रस्ते विकासाच्या कामांवर आम्ही भर दिला आहे. जिजामाता रुग्णालयातील विद्युत कामे असोत किंवा रावेत उपसा केंद्राची दुरुस्ती, नागरिकांना अखंडित सेवा मिळावी हाच आमचा उद्देश आहे. झोपडपट्टी पुनर्वसनासाठी संक्रमण शिबिराची उपलब्धता आणि महापालिका शाळांमधील सुविधांच्या दुरुस्तीमुळे सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होईल. शहराच्या हिताचे हे सर्व प्रकल्प कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.”
— अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशब्दांशी जोडले नाते’
Next Article महापालिकेच्या कार्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान – सहआयुक्त मनोज लोणकर
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज प्रस्तुत ‘नवदुर्गा’ मालिका हिंदवी न्यूज | पिंपरी : हिंदवी न्यूजच्या ‘नवदुर्गा’ या विशेष…

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?