Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»नाल्यांद्वारे नदीत सांडपाणी सोडणाऱ्यांवर तात्काळ  कडक कारवाई करा – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड

नाल्यांद्वारे नदीत सांडपाणी सोडणाऱ्यांवर तात्काळ  कडक कारवाई करा – महापौर रवि लांडगे

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

किवळे परिसरात महापौरांची प्रत्यक्ष पाहणी;

एसटीपी सक्ती, दंडात्मक कारवाई आणि जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश

पिंपरी ( हिंदवी न्यूज)

किवळे परिसरातील सिम्बॉयसिस कॉलेज व आसपासच्या गृहनिर्माण सोसायट्यांमधून नाल्यांद्वारे थेट पवना नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याबाबत महापौर रवि लांडगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ  कडक कारवाईचे निर्देश दिले

यावेळी नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे, माजी नगरसदस्य तुकाराम भोंडवे, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट, उपअभियंता दीपक करपे, कनिष्ठ अभियंता प्रसाद संकपाळ तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौरांनी पाहणीदरम्यान स्पष्ट शब्दांत सांगितले की,“नाल्यांद्वारे थेट सांडपाणी नदीत सोडणे हा गंभीर पर्यावरणीय गुन्हा असून, अशा प्रकरणांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

महापौरांचे ठोस निर्देश व कार्यवाही:

१. तात्काळ सर्वेक्षण मोहीम: किवळे व परिसरातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांचे ७ दिवसांत सर्वेक्षण करून, सांडपाणी थेट नाल्यात सोडणाऱ्या सोसायट्यांची यादी तयार करावी.

२. एसटीपी (STP) सक्तीने कार्यान्वित करणे:  ज्या सोसायट्यांमध्ये एसटीपी अस्तित्वात असूनही कार्यरत नाही, त्या त्वरित सुरू कराव्यात. नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करावी.

३. थेट नाल्यांशी जोडणी तोडणे:  नाल्यांद्वारे नदीत जाणाऱ्या सर्व बेकायदेशीर जोडण्या शोधून तात्काळ बंद कराव्यात.

४. दंड व कायदेशीर कारवाई: पर्यावरण संरक्षण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्या/संस्थांवर दंड आकारून, आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवावी.

५. सांडपाणी पुनर्वापर अनिवार्य: प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर बाग, फ्लशिंग व इतर उपयोगासाठी करण्याची सक्ती करावी.

६. जबाबदारी निश्चित करणे: संबंधित क्षेत्रातील अभियंते व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून, दुर्लक्ष झाल्यास त्यांच्यावरही प्रशासकीय कारवाई करावी.

७. नियमित मॉनिटरिंग यंत्रणा: दर आठवड्याला प्रगती अहवाल सादर करणे बंधनकारक करावे. तसेच तांत्रिक साधनांचा वापर करून सतत देखरेख ठेवावी.

संपूर्ण शहरात मोहीम राबविणार

महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट केले की, ही कारवाई केवळ किवळे किंवा पवना नदीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येणार आहे. इंद्रायणी, मुळा आणि पवना या तिन्ही नद्यांमध्ये नाल्यांद्वारे सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याविरुद्ध एकत्रित मोहीम हाती घेण्यात येणार असून, सर्व संबंधित विभागांना याबाबत समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पर्यावरण संरक्षणासाठी समन्वय

महापौरांनी पर्यावरण विभागासोबत सविस्तर चर्चा करत सांडपाणी थेट नदीत जाणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. यामध्ये नाल्यांचे इंटरसेप्शन, डायव्हर्शन व एसटीपीकडे वळविणे यावर भर देण्यात आला.

‘सांडपाणी मुक्त नदी’ या अभियानाचा उल्लेख करत महापौरांनी सांगितले की,ही मोहीम केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन माहिती द्यावी. प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातूनच शहरातील नद्या खऱ्या अर्थाने स्वच्छ व प्रदूषणमुक्त होतील. पिंपरी-चिंचवडमधील इंद्रायणी, मुळा व पवना या नद्यांचे प्रदूषण रोखणे ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असून, यापुढे कोणत्याही प्रकारची बेफिकिरी सहन केली जाणार नाही. संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून निश्चित कालमर्यादेत परिणाम दिसतील याची दक्षता घ्यावी, असे महापौरांनी स्पष्ट केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, कोकण विभाग पुन्हा अव्वल
Next Article क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय प्रत्येकाला देशप्रेमाची प्रेरणा देणारी ठरेल – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज प्रस्तुत ‘नवदुर्गा’ मालिका हिंदवी न्यूज | पिंपरी : हिंदवी न्यूजच्या ‘नवदुर्गा’ या विशेष…

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?