Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य

May 17, 2026

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»एमआयडीसीतील पाणी, स्वच्छता व रस्ते प्रश्न तातडीने सोडवणार आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी 
पिंपरी चिंचवड

एमआयडीसीतील पाणी, स्वच्छता व रस्ते प्रश्न तातडीने सोडवणार आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी 

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 10, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

लघुउद्योग व उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक

 

पिंपरी (हिंदवीन्यूज)

एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, घातक कचरा व्यवस्थापन तसेच लघुउद्योगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. उद्योगधंद्यांना सक्षम, सुरक्षित आणि विकासपूरक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. एमआयडीसी भागांचा सर्वांगीण विकास हा महापालिकेचा प्राधान्यक्रम असून, मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा आणि कामांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात शहरातील लघुउद्योग संघटना तसेच एमआयडीसीमधील विविध उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याबैठकीत औद्योगिक क्षेत्रासमोरील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पायाभूत विकास आणि प्रशासकीय समन्वय यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी परिसरातील पाणीटंचाई, कचरा संकलनातील अडचणी, झाडलोट, खराब रस्ते, वाहतूक समस्या आणि घातक कचरा व्यवस्थापनाबाबत विविध मुद्दे मांडले. यावेळी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी औद्योगिक क्षेत्रासमोरील विविध समस्या, प्रलंबित प्रश्न तसेच एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांबाबतच्या मागण्या आयुक्तांसमोर सविस्तर मांडल्या. उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने ठोस, नियोजनबद्ध आणि तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, मनोज सेठिया, उपायुक्त सिताराम बहुरे, व्यंकटेश दुर्वास, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, अतुल पाटील, अजिंक्य येळे, परशुराम वाघमोडे, निवेदिता घार्गे, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सीएसआर सेलचे मुख्य समन्वयक विजय वावरे, श्रुतिका मुंगी यांच्यासह लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष अभय भोर, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, संजय सातव, नवनाथ वायाळ, डी. के. साळुंखे, तात्यासाहेब सपकाळ, नवनाथ बडे, मकरंद सदरे, बी. जी. औटी तसेच महिला लघुउद्योग संघटनेच्या दुर्गा भोर, जयश्री साळुंखे, रेश्मा मुल्ला, स्वाती मगर, वैभव जगताप आदी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एमआयडीसी परिसरात नियोजनबद्ध आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना तातडीच्या सूचना दिल्या. तसेच कचरा विलगीकरण, वेळेत कचरा संकलन आणि दैनंदिन स्वच्छता मोहिमेवर विशेष भर देत परिसर अधिक स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवण्याचे निर्देश दिले. लवकरच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत एमआयडीसी परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करून समस्यांचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

औद्योगिक भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, खड्डेमुक्त रस्ते, सुकर वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षित औद्योगिक वातावरण निर्मितीसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. घातक कचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

उद्योग क्षेत्राच्या समस्या प्रलंबित राहू नयेत यासाठी दर महिन्याला नियमित आढावा बैठक घेण्यात येईल. ‘उद्योग सारथी’ या उपक्रमाच्या माध्यमातून उद्योग संघटना आणि प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण संवाद ठेवून स्थानिक पातळीवरील प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल. शहरातील उद्योगवाढीस गती देण्यात येईल, असेही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. याशिवाय पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता तसेच, महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक प्रवास सुविधा आणि स्वच्छतागृहांची उपलब्धता याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

Post Views: 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांची आकाशवाणी पुणे केंद्राला सदिच्छा भेट
Next Article उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य

May 17, 2026

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026

वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

May 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य

By Hindavinewsnetwork@gmail.comMay 17, 20260
Spread the love

विश्वकोश निर्मिती मंडळ व पुस्तकांचे गाव भिलार येथे अभ्यास सहल पिंपरी, (हिंदवी न्यूज)-  इंद्रायणी…

Loading

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026

वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

May 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?