Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

October 11, 2026

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा 17 वा पदवीदान सोहळा उत्साहात
पिंपरी चिंचवड

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा 17 वा पदवीदान सोहळा उत्साहात

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 11, 2026Updated:May 11, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

या पदवी प्रदान समारंभातून विकसित भारताचे भावी शिल्पकार घडत आहेत” : ज्योतिरादित्य एम. सिंधिया.

पिंपरी, (हिंदवी न्यूज)

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे (अभिमत विद्यापीठ) येथे 17 वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभासाठी  केंद्रीय दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री (भारत सरकार ) ज्योतीरादित्य सिंधिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  डॉ. पी. डी. पाटील ,(कुलपती,  डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे) होते.

या कार्यक्रमात मा. डॉ. (ब्रिगे.) अमरजित सिंग (निवृत्त) माजी प्रभारी कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि माजी अधिष्ठाता, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे तसेच मा. डॉ. ए. एल. काकराणी वैद्यकीय क्षेत्रातील प्रख्यात प्राध्यापक तसेच संचालक – शैक्षणिक सहयोग विभाग डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे. यांना  त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध विद्याशाखांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 30 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखेतील 18,720 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली . यामध्ये 48 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 16,752 पदव्युत्तर पदवी, 1,905 पदवी व 15 पदविका या अशा एकूण 9 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी  डॉ. सौ. भाग्यश्री पी. पाटील (प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि अध्यक्षा, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे), मा. डॉ. सोमनाथ पी. पाटील (प्र-कुलपती, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील युनीटेक सोसायटी, पुणे), मा. डॉ. एन. जे. पवार (कुलगुरू डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे), मा. डॉ. सौ. स्मिता जाधव (प्र-कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे) तसेच मा. डॉ. यशराज पी. पाटील (विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे) यांच्यासह इतर मान्यवर, प्राध्यापक सदस्य, विद्यार्थी आणि पालक  उपस्थित होते.

यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, आज पदवीदान समारंभात शैक्षणिक वस्त्र परिधान करून उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांकडे पाहताना मला विकसित भारत २०४७ चे भावी शिल्पकार दिसत आहेत. विकसित भारत २०४७च्या स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी परिवर्तनाचे नेतृत्व करत सक्रिय योगदान द्यावे. पदवीदान समारंभ हा शेवट नसून, तो आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे येथे मिळालेले शिक्षण, संस्कार आणि अनुभव तुम्हाला आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची, बदलांना सामोरे जाण्याची आणि राष्ट्रनिर्मितीत अर्थपूर्ण योगदान देण्याची ताकद देतील, असेही ते यावेळी म्हणाले.  आज भारत एका ऐतिहासिक व निर्णायक टप्प्यावर उभा आहे. आरोग्यसेवा, नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये अफाट संधी उपलब्ध आहेत. मी प्रत्येक विद्यार्थ्याला आवाहन करतो की, केवळ नोकरीचा विचार करू नका, तर आपल्या कार्यातून समाजावर आणि देशावर काय सकारात्मक प्रभाव पडेल याचाही विचार करा. धाडसाने जोखीम घ्या, सातत्याने नवे शिकत राहा, आपल्या संस्थेशी कायम जोडलेले राहा आणि आपल्या या यशस्वी प्रवासामागे असलेल्या पालक व शिक्षकांचे योगदान सदैव स्मरणात ठेवा. स्वतःसाठी काहीतरी अर्थपूर्ण उभारा, इतरांसाठीही काहीतरी घडवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे — मातृभूमी भारतासाठी काहीतरी महान निर्माण करा.” असे आवाहन त्यांनी स्नातकांना केले.

डॉ. पी. डी. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले – ” पदवीप्रदान समारंभ हा संपूर्ण ‘डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ’ परिवारासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. 2003 मधील स्थापनेपासून आजवर, हे विद्यापीठ शैक्षणिक गुणवत्ता, नवनवीन प्रयोग (Innovation), आरोग्य सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध असलेले एक बहुविद्याशाखीय केंद्र म्हणून नावारूपास आले आहे. भारतीय मूल्यांची जोपासना करत जागतिक दर्जाचे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या ध्येयानेच आमच्या या प्रगतीची वाटचाल झाली आहे. आज पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. आपल्या व्यावसायिक आयुष्यात पाऊल टाकत असताना, मी तुम्हा सर्वांना असे आवाहन करतो की, तुम्ही तुमची कौशल्ये सातत्याने विकसित करावीत, आपली क्षमता विस्तारत राहावी आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी पूर्ण निष्ठेने आणि सार्थ हेतूने करावा.” असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

 

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकुदळवाडी, जाधववाडी परिसरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा
Next Article शिवरूद्र शंभुराजे’ च्या पहिल्या महानाट्याला शिवशंभूप्रेमींची भरभरून दाद
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
आळंदी

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी  सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चार शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचे…

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?