कबीर कांबळे भारतीय वनसेवेत होणार दाखल. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार
पिंपरी, ( हिंदवी न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील मासुळकर काॅलनी येथील कबीर राहुल कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत देशभरातून १२५ वी रँक मिळवित भारतीय वन सेवा (Indian Forest Service – IFS) पदावर निवड होऊन शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय व प्रेरणादायी यशाबद्दल त्यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी महापौर तथा नगरसदस्या वैशाली घोडेकर, नगरसदस्या सारिका मासूळकर तसेच कांबळे कुटुंबीय उपस्थित होते. उपस्थितांनी कबीर कांबळे यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा अभिमान उंचावला असून, शहरातील तरुणांसाठी कबीर कांबळे हे प्रेरणास्थान ठरले आहेत. भारतीय वन सेवेमार्फत देशाच्या पर्यावरण संवर्धन व नैसर्गिक संपत्तीच्या जतनासाठी ते निश्चितच उल्लेखनीय कार्य करतील असा विश्वास महापौर रवि लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.
![]()
