Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»‘शिवरूद्र शंभुराजे’ महानाट्य हे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचविणारा स्तुत्य उपक्रम – आमदार अमित गोरखे
पिंपरी चिंचवड

‘शिवरूद्र शंभुराजे’ महानाट्य हे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचविणारा स्तुत्य उपक्रम – आमदार अमित गोरखे

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 13, 2026Updated:May 13, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी,  (हिंदवी न्यूज)–  छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्यासाठीचे योगदान सर्वश्रुत असले तरी युवा पिढी आणि शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा इतिहास जिवंत स्वरूपात अनुभवता यावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महानाट्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी प्रत्येकाने आपल्या परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांना अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित करावे, जेणेकरून प्रत्येकाला हा इतिहास जीवंतपणे अनुभवण्याची संधी मिळेल, असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय पराक्रम, राष्ट्रनिष्ठा  आणि स्वराज्य रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाच्या  जाज्वल्य गाथेचा इतिहास उलगडणाऱ्या ‘शिवरूद्र शंभुराजे’ या भव्य महानाट्याच्या दुसऱ्या प्रयोगास काल प्रारंभ झाला, यावेळी आमदार अमित गोरखे  बोलत होते. काल झालेल्या महानाट्याच्या कार्यक्रमास नगरसदस्य तुषार हिंगे, कुशाग्र कदम, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते सागर तापकीर, राजेंद्र घावटे, संजय कुरबेट्टी, हेमा पारिसकर, जितेंद्र छाबडा यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अमित गोरखे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त महानगरपालिका, प्रभागातील नगरसदस्य आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये सामाजिक संघटनांचा देखील सहभाग असून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये इतिहास घडविणारा आणि ऐतिहासिक ठरणारा हा सांस्कृतिक उपक्रम सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने सुरू झाला असून तो भविष्यातही अखंडपणे सुरू राहील, असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला.

१० ते १४ मे २०२६ या कालावधीत चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वाअंतर्गत ११ ते १३ मे २०२६ यादरम्यान शिपस्पर्श शिवसह्याद्री प्रतिष्ठान निर्मित ‘शिवरूद्र शंभुराजे’ या महानाट्याचे सादरीकरण होत आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर असलेले हे महानाट्य ॲड. विनय चंद्रकांत दाभाडे लिखित व दिग्दर्शित असून प्रतिक चंद्रकांत दाभाडे यांनी सहदिग्दर्शन केले आहे.  तीन मजली भव्य रंगमंच, २०० हून अधिक कलाकारांचा सहभाग, थरारक लढाईचे प्रसंग तसेच महाराष्ट्रातील विविध लोककलांचा समावेश असलेल्या या महानाट्यातून छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्षमय जीवनप्रवास प्रभावीपणे उभा करण्यात आला आहे. संभाजीनगर, चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानाच्या मागील बाजूस शिवशंभो उद्यानासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत हे महानाट्य रंगत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, स्वराज्याच्या विचारांचे संवर्धन करणे आणि इतिहासाबाबत जनजागृती घडवून आणणे हा या महानाट्याच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

गुरूवार दि.१४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाद्वारे त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस तर १०.४५ वाजता बर्ड व्हॅली येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास खासदार, आमदार, महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ५ वाजता शिवशाहीर सुरेश सुर्यवंशी आसंगीकर यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शाहीरीचा कार्यक्रम तर सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे “छत्रपती संभाजी महाराज-एक अद्वितीय योध्दे” या विषयावर व्याख्यान होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना शहरवासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड क्रीडा क्षेत्रातही देशाला दिशा देणारे शहर ठरतेय – महापौर रवि लांडगे
Next Article पिंपरी-चिंचवडच्या सुपुत्राची राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग भरारी
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज प्रस्तुत ‘नवदुर्गा’ मालिका हिंदवी न्यूज | पिंपरी : हिंदवी न्यूजच्या ‘नवदुर्गा’ या विशेष…

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?