Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»स्थायी समिती सभेत पायाभूत सुविधा व विकासकामांसह विविध विषयांना मान्यता
पिंपरी चिंचवड

स्थायी समिती सभेत पायाभूत सुविधा व विकासकामांसह विविध विषयांना मान्यता

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 15, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

 

पिंपरी, (हिंदवी न्यूज) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते दुरुस्ती, आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, जाहिरात व्यवस्थापन तसेच विविध विकासकामांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांना मान्यता देण्यात आली. यावेळी स्थायी समिती सदस्यांसह आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

स्थायी समिती सभेत शहरातील विविध गावांमध्ये नगररचना योजना राबविण्यासाठी नियुक्त सल्लागार संस्थेस मुदतवाढ देणे तसेच संरक्षण विभागाला विविध ठिकाणसाठीच्या रहिवासी सदनिका उभारणी कामांसाठी मंजुरी देण्यात आली. याशिवाय शहरातील पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्यासाठी विविध कामांना मान्यता देण्यात आली. ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १७ मधील बिजलीनगर, बळवंतनगर, रस्टन कॉलनी परिसरातील जुन्या पाइपलाइन बदलून नवीन पाइपलाइन टाकण्यास मंजुरी देण्यात आली. दापोडी भागात आवश्यकतेनुसार एचडीपीई व डीआय पाइपलाइन टाकणे, नवी सांगवी व जुनी सांगवी परिसरात नवीन पाइपलाइन टाकणे आणि इतर अनुषंगिक कामांना मान्यता देण्यात आली.

जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर २३ येथे नवीन ऑटो-क्लोरीनेशन सिस्टीम बसविणे तसेच तिची देखभाल-दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. सेक्टर २३, निगडी व चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रांसाठी निर्जंतुकीकरण प्रक्रियेस आवश्यक क्लोरीन गॅस खरेदी तसेच आवश्यक रसायनांच्या खरेदीलाही मान्यता देण्यात आली. ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत थेरगाव गावठाण, रहाटणी आणि पिंपरी परिसरातील जलनिस्सारण सुधारणा, नवीन जलनिस्सारण नलिका टाकणे तसेच विद्यमान नलिकांची देखभाल-दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध भागांतील जलनिस्सारण विषयक कामांना मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक १ मध्ये आवश्यक ठिकाणी स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे तसेच पिंपरीतील मिलिंदनगर, कैलासनगर, वैभवनगर आणि महात्मा गांधी नगर परिसरातील जलनिस्सारण विषयक कामांनाही मंजुरी देण्यात आली.

रस्ते, फुटपाथ आणि स्थापत्य विषयक विविध विकासकामांनाही स्थायी समितीने मान्यता दिली. प्रभाग क्रमांक २५ मधील वाकड, पुनावळे, ताथवडे परिसरातील नव्याने ताब्यात येणारे रस्ते विकसित करणे, स्थापत्य विषयक देखभाल-दुरुस्ती कामे करणे तसेच पावसाळी पाण्याच्या लाईनची दुरुस्ती व नवीन लाईन टाकण्याची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर आणि प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव परिसरातील फुटपाथ व पेव्हिंग ब्लॉक दुरुस्तीची कामे, तसेच मनपाच्या इमारती व स्मशानभूमींमधील स्थापत्य विषयक दुरुस्तीची कामे करण्यास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक ६ मधील धावडेवस्ती, गुळवेवस्ती, भगतवस्ती, चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती, सद्गुरूनगर, महादेवनगर, लांडगेवस्ती परिसरातील रस्त्यांचे ऑटोमेटेड सर्वेक्षणानुसार डांबरीकरण व दुरुस्ती कामांना मंजुरी देण्यात आली. ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २१ पिंपरी, प्रभाग क्रमांक २३ थेरगाव गावठाण, प्रभाग क्रमांक २४ बेलठिकानगर आणि प्रभाग क्रमांक २७ रहाटणी येथील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांनाही मान्यता देण्यात आली. काळेवाडी येथील ज्योतिबा गार्डनमध्ये कुस्तीचा आखाडा उभारण्यास तसेच पिंपळे निलख येथील सर्व्हे क्रमांक २८ मध्ये महिला बाजार हट केंद्र उभारणीस मंजुरी देण्यात आली. याच परिसरातील महापालिकेच्या ताब्यातील मोकळ्या जागेचे काँक्रीटीकरण व इंटरलॉकिंग ब्लॉक बसविण्याच्या कामांनाही मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक १८ मधील दत्तात्रय मरळ उद्यान ११ महिन्यांच्या कालावधीसाठी मानधन तत्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिक्षण आणि प्रशासकीय कामकाजाशी संबंधित विषयांनाही सभेत मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या ई-लर्निंग प्रकल्पांतर्गत शाळा व कार्यालयांसाठी इंटरनेट बँडविड्थ सेवा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच लेखा विभागासाठी सन २०२५-२६ चे सुधारित व सन २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रकीय पुस्तके छपाई करून पुरवठा करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. आरोग्य आणि देखभाल व्यवस्थेसंदर्भातही विविध निर्णय घेण्यात आले. प्रभाग क्रमांक २१ मधील जिजामाता रुग्णालयात स्थापत्य विषयक कामे करण्यासही मंजुरी देण्यात आली.

महानगरपालिकेच्या विविध विभागांसाठी मनुष्यबळ आणि सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दैनंदिन देखभाल-दुरुस्तीसाठी मनुष्यबळ पुरविण्याच्या खर्चास मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळासोबत नव्याने करारनामा करून २१८ सुरक्षा रक्षकांच्या वेतनासाठी येणाऱ्या खर्चालाही मान्यता देण्यात आली. ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ३१ व ३२ मधील सार्वजनिक शौचालयांच्या दैनंदिन साफसफाईसाठी होणाऱ्या खर्चासही मान्यता देण्यात आली. याशिवाय अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मोरवाडी आयटीआय व इतर इमारतींमधील विद्युत व्यवस्थेचे नूतनीकरण, जुनी सांगवी येथील शाळा इमारतींची स्थापत्य व रंगरंगोटी कामे तसेच विविध विकासकामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी स्थापत्य, उद्यान व क्रीडा विभागामार्फत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यासही स्थायी समितीने मान्यता दिली.

 

शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या दृष्टीने स्थायी समिती सभेत पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते दुरुस्ती, आरोग्य, शिक्षण, सुरक्षा तसेच मेट्रोसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांशी संबंधित विविध विषयांना मान्यता देण्यात आली आहे. नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सक्षम नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच शहराच्या वाढत्या गरजांनुसार विकासकामे वेळेत पूर्ण करणे यावर महापालिकेचा भर राहणार आहे. विकासकामांमध्ये सुसूत्रता, पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य देत शहराच्या सर्व भागांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.

– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleऊर्जा बचत धोरणाबाबत महापालिकेची महत्त्वपूर्ण बैठक
Next Article पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समित्यांची पुनर्रचना; १० क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?