पिंपरी, (हिंदवी न्यूज)- महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते यशवंत कण्हेरे, विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
![]()
