पिंपरी, (हिंदवी न्यूज ) – सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ आदर्श नगर, किवळे -रावेत संघाचा मे महिन्यातील सभासद अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संघाच्या 36 सभासदांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या निमित्ताने सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित जुन्या- नव्या मराठी, हिंदी गीतांची कराओके मैफिल “स्वर यात्रा” या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक निलेश तरस यांच्या हस्ते करण्यात आले. स्वर यात्रा कार्यक्रमात रोहिदास पिलाने, शिवकांत जैस्वाल, सुमंगेश कुलकर्णी, भीमाशंकर जाधव, बाळासाहेब जगदाळे, बाळासाहेब क्षीरसागर, मुरलीधर भोलणकर, स्नेहा मुळे, प्रेरणा पाटील, विजय उपासनी या कलाकारांनी विविध मराठी, हिंदी भावगीत, भक्तीगीत, लोकगीत, फिल्मी गीत सादर केले. त्यास उपस्थित रसिक प्रेक्षकांनी प्रत्येक गीताच्या सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाटासह भरभरून दाद दिली. “स्वर यात्रा”
कार्यक्रमाची निर्मिती सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ संचालक मंडळ यांनी केली. संकल्पना -रोहिदास पिलाने यांची होती. निवेदन सुरेश बडगुजर यांनी केले. संगीत संयोजक सुहास माणगावकर तर प्रायोजक निलेश तरस होते. संघाचे अध्यक्ष -सुदाम दिवटे ,उपाध्यक्ष- साहेबराव पाटील, सचिव -सुरेश बडगुजर, खजिनदार- प्रकाश सावंत, सहसचिव- तुकाराम कोरडे, सह खजिनदार- किशोर गायकवाड, संचालक -धोंडीराम पाटील, राजेंद्र मोरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
![]()
