पर्यावरणदिनी वृक्षारोपण, नदी स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प
पिंपरी, (हिंदवी न्यूज)- मोदी सरकारच्या बारा वर्षेपूर्ती व ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजप महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड शहरात एक लाख वृक्षारोपण करण्याचं नियोजन करण्यात आले आहे. ५ जून रोजी सकाळी सात ७ वाजता या वृक्षारोपणाची सुरुवात दुर्गा टेकडी येथे एक हजार वृक्षारोपण करून ,संपूर्ण दिवसभरात चिंचवड, पिंपरी, भोसरी अशा तीनही विधानसभेमधील १४ मंडले ते बूथ स्तरापर्यंत वृक्षारोपण होणार आहे
भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे हे या अभियानाचे जिल्हा संयोजक आहेत तर सहसंयोजक म्हणून मनोज तोरडमल व रमेश वहिले यांना जबाबदारी दिली आहे. खासदार प्रा. मेघा कुलकर्णी यांना या अभियानाची पश्चिम महाराष्ट्र संयोजक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे
या अभियानात भाजपा शहराध्यक्ष नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे, चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप ,आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे ,आमदार अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे हे विविध ठिकाणी वृक्षारोपण करून अन्य ठिकाणी प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सर्व मंडल अध्यक्ष,नगरसेवक, नगरसेविका, माजी नगरसेवक, पक्षाचे वरिष्ठ नेते, शक्ती प्रमुख, बूथ प्रमुख सर्व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या बूथ वर वृक्षारोपण करणार आहेत. तसेच जनसहभागातून त्याचबरोबर सामाजिक संस्था, मंडळे यांच्या सहकार्याने पहिल्याच दिवशी किमान १५००० वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील पंधरा दिवसात संपूर्ण शहरात एक लाखाहून अधिक वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यासोबत नदी स्वच्छता, प्लास्टिक मुक्त पर्यावरण जनजागृती व स्वच्छता अभियान शहरातील विविध भागात राबवले जाणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनाही या अभियानात सहभाग घ्यावा व वृक्षारोपण करून त्याच्या संगोपनाचे नियोजनही करावे, असे आवाहन शहराध्यक्ष शत्रुघ्न बापु काटे व जागतिक पर्यावरण दिन अभियान जिल्हा संयोजक मधुकर बच्चे यांनी केले आहे.
![]()
