Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»शहराच्या विकासात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अर्थात उद्योगांचे सामाजिक दायित्व निधीची भूमिका महत्वाची : महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड

शहराच्या विकासात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अर्थात उद्योगांचे सामाजिक दायित्व निधीची भूमिका महत्वाची : महापौर रवि लांडगे

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 12, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

महापालिकेतर्फे शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या, उद्योग समूहांसोबत संवाद बैठक

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड शहराची देशपातळीवरील वेगळी ओळख ही येथील उत्कृष्ट पायाभूत सुविधांमुळे निर्माण झाली आहे. शहराच्या विकासात आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीची (अर्थात उद्योगांचे सामाजिक दायित्व ) भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. शहरातील विविध उद्योग समूहांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून महापालिकेला दिलेल्या सहकार्यामुळे अनेक लोकाभिमुख उपक्रम आणि विकासकामे यशस्वीपणे राबविता आली आहेत. यापुढेही हे सहकार्य कायम ठेऊन उद्योगसमुहांनी शहराच्या विकासात उस्फूर्तपणे हातभार लावावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सी.एस.आर. कक्ष अंतर्गत शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या तथा उद्योग समूह यांच्याद्वारे प्राप्त होणारा सी. एस. आर. निधी मिळविणे तसेच त्याचा योग्य वापर करून शहराच्या शाश्वत विकासात हातभार लावणे या उद्देशाने मोरवाडी येथील दिव्यांग भावन फाऊंडेशन येथे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मनोगत व्यक्त करताना महापौर रवि लांडगे बोलत होते. या बैठकीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सह आयुक्त मनोज लोणकर, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक वारे गुरूजी, सीएसआर कक्षाचे विजय वावरे, श्रुतिका मुंगी यांच्यासह अल्फा लावल, एल्केजेन, एरॅमॉन्ड, ऍटलास कॉप्को, ऍटकॉम लिमिटेड, बजाज फायनान्स, बिसलेरी, बीएमसी सॉफ्टवेअर, ब्रिजस्टोन, सीआयई इंडिया, डीएएनए लिमिटेड, डेलोरोटो इंडिया, डायम डिस्प्ले, डी-मार्ट, फिआट, कावासाकी मोटर्स, पदमजी, सॅडविक कोरोमंट, एसकेएफ इंडिया, टाटा मोटर्स, थरमॅक्स, टीकेआयएल, डब्ल्यूटीई इन्फ्रा, यझाकी, ऍडियंट लिमिटेड, बजाज ऑटो, बॉश, गरवारे, हुडको आदी कंपन्यांचे सीएसआर प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, पिंपरी चिंचवड हे औद्योगिकदृष्ट्या देशातील अग्रगण्य शहर असून येथील कंपन्या सामाजिक उत्तरदायित्व जपण्यामध्येही तितक्याच पुढे आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग क्षेत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी एकत्रितपणे काम करणे ही काळाची गरज असून, पिंपरी चिंचवडमधील उद्योग समूहांनी याचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. सीएसआर निधीच्या उपलब्धतेच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड शहरात मोठी क्षमता असून, अशा प्रकारचे सीएसआर पोटेन्शियल देशातील फार कमी शहरांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे उद्योग समूहांनी शहराच्या सामाजिक विकासामध्ये अधिक सक्रिय सहभाग नोंदवावा.

महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे उभारण्यात आलेले दिव्यांग भवन फाऊंडेशन हे देशातील एकमेव आणि वैशिष्ट्यपूर्ण केंद्र असून ते इतर महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. दिव्यांग नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना आवश्यक उपचार, पुनर्वसन, प्रशिक्षण आणि विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे केंद्र कार्यरत असल्याचे महापौर यांनी सांगितले. शिवाय, उद्योग क्षेत्राच्या सहभागामुळे दिव्यांग बांधवांसाठी आधुनिक सुविधा, अत्याधुनिक उपचार व्यवस्था आणि विविध कल्याणकारी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होईल. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सोयीसुविधा पोहोचविण्यासाठी महापालिका आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील हे सहकार्य अधिक दृढ व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील विविध उद्योग समूह सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सीएसआर निधीच्या माध्यमातून शहराच्या विकासात सक्रिय योगदान देत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सेवा, सामाजिक विकास तसेच विविध पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये सीएसआर निधीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प आणि उपक्रम राबविण्यात आले आहेत. दिव्यांग भवन फाऊंडेशन हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद उपक्रम असून दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी हे केंद्र प्रभावीपणे कार्यरत आहे. देशातील इतर महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दिव्यांग भवन फाऊंडेशन हे एक आदर्श मॉडेल म्हणून उदयास आले आहे. तसेच दिव्यांग बांधवांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी उद्योग क्षेत्राचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, शहरातील जास्तीत जास्त कंपन्यांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील यावेळी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केले.

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले, समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या सीएसआर उपक्रमाचे भागीदार होण्याची संधी मिळणे ही प्रत्येकासाठी अभिमानाची आणि भाग्याची बाब आहे. ज्या शहराने आपल्याला ओळख, संधी आणि प्रगतीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्या शहराच्या विकासासाठी आपणही आपले योगदान देणे ही सामाजिक जबाबदारी आहे. मोरवाडी येथे उभारण्यात आलेले दिव्यांग भवन फाऊंडेशन हे शहराचा अभिमान असून दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. या दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या कार्याचा व शहराच्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचा गौरव राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी उद्योग समूहांनी सीएसआर निधीच्या माध्यमातून अधिकाधिक सहकार्य करावे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय वावरे यांनी केले.  सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. उपस्थितांचे आभार मनोज लोणकर यांनी मानले.

Loading

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरूजी यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान
Next Article विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच अधिकाऱ्यांसमवेत घेतली बैठक
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

भाजपा शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 20260
Spread the love

विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर…

Loading

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?