Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»दुर्गादेवी टेकडीवर ‘हरित पिंपरी-चिंचवड’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ
पिंपरी चिंचवड

दुर्गादेवी टेकडीवर ‘हरित पिंपरी-चिंचवड’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 15, 2026Updated:June 15, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

उपस्थितांनी घेतली जास्तीत जास्त झाडे लावण्याची शपथ; पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प.

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहराचे वैभव असलेल्या दुर्गादेवी टेकडी सारख्या विविध ठिकाणी पाच लाख झाडे लावून ती जगविण्याचा निर्धार महापालिकेने केला. यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहर अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दुर्गाटेकडी येथे मान्यवरांच्या हस्ते १,००० रोपांची लागवड करून ‘हरित पिंपरी-चिंचवड शहर’ आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी महापौर रवि लांडगे बोलत होते.  यावेळी ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी विजय जगताप लिखित ‘दुर्गा टेकडीचा ५० वर्षांचा इतिहास’ या माहितीपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे,आमदार अमित गोरखे, उमा खापरे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, नगरसदस्या शैलजा मोरे, अरूणा लंगोटे, नगरसदस्य कुशाग्र कदम, नीलेश नेवाळे, अमित गावडे, निलेश तरस, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, मनोज सेठीया यांच्यासह भारतीय लष्कराचे ब्रिगेडीअर प्रकाश भारती, कर्नल अनिल फाटक, पोलीस उपआयुक्त विक्रम देशमुख, जुन्नर येथील वृक्षमित्र प्रकाश करमाळे, सामाजिक कार्यकर्ते अमोल भोंडवे, प्रा.नामदेव जाधव यांच्यासह नागरिक, पर्यावरण प्रेमी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह ते दुर्गादेवी टेकडी दरम्यान १० किलोमीटर अशी सायकल फेरी आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांच्यासह शेकडो सायकलपटू सहभागी झाले होते. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, झाडांची केवळ लागवड करणे पुरेसे नाही, तर त्यांची योग्य निगा राखणे आणि त्यांना जगविणे हे प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सामाजिक बांधिलकीतून शहर स्वच्छ ठेवणे, कचरा न करणे आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी देखील आहे. आमदार अमित गोरखे म्हणाले, वृक्ष लावणे हे आपले आद्य कर्तव्य आहेच, परंतु त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपण लावलेले किमान एक झाड पूर्णपणे जगविण्याचा संकल्प केला पाहिजे.

आमदार उमा खापरे म्हणाल्या, पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःहून झाडे लावून दुस-यांनाही झाडे लावण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगायचे आहे, जेणेकरून पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्यास मदत होईल. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, दुर्गा टेकडी हे केवळ एक उद्यान नसून पिंपरी चिंचवड शहराचे अमूल्य नैसर्गिक रत्न आहे. ‘दुर्गा’ या नावातच सामर्थ्य आणि ऊर्जा दडलेली असून ही टेकडी नागरिकांना सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा आणि निसर्गाशी जोडणारी महत्त्वाची जागा आहे. या टेकडीचे वैभव घडविण्यात अनेक घटकांचे योगदान आहे. तिचे पावित्र्य, स्वच्छता आणि नैसर्गिक संतुलन राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. दुर्गा टेकडीला देशपातळीवर एक प्रमुख प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. त्याचबरोबर यावर्षी शहरातील वृक्षाच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

दुर्गादेवी टेकडीच्या उभारणीतील शिल्पकारांचेही स्मरण. …. निगडी येथील ओसाड आणि खडकाळ टेकडीचे रूपांतर आजच्या नयनरम्य ‘दुर्गादेवी टेकडी उद्यानात’ करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पहिल्या पिढीतील शिल्पकारांच्या योगदानाचाही यावेळी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करण्यात आला. महानगरपालिकेचे पहिले प्रशासक हरनामसिंग, माजी अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंढे आणि तत्कालीन मुख्य उद्यान अधीक्षक शांताराम भोंडवे यांच्या दूरदृष्टी आणि अथक परिश्रमांमुळेच हे विस्तीर्ण हरित वैभव उभे राहिले. त्यांनी केवळ प्रशासकीय जबाबदारी म्हणून नव्हे, तर एक सामाजिक कर्तव्य म्हणून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या टेकडीवर लाखो वृक्षांचे जतन करून शहराला ऑक्सिजन हब मिळवून दिला. त्यांच्या याच ऐतिहासिक कार्याचा वारसा पुढे चालवत महापालिकेने आता ५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.

*उपस्थितांनी घेतली माझी वसुंधरा शपथ* 

“आम्ही भारताचे सुजाण नागरिक शपथ घेतो कि, आम्ही या भारत मातेला, या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करू, या वसुंधरेला, या पर्यावरणाला आमच्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊ, या देशाला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी आम्ही कटीबध्द राहू व आमच्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम आम्ही करणार नाही, जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू” अशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली. शपथेचे वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Loading

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त महापौर रवि लांडगे यांच्यासह पदाधिका-यांची नियोजन बैठक
Next Article जनगणना २०२७ चा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात. घर सूचीकरण प्रक्रिया पूर्णत्वाकडे
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

भाजपा शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 20260
Spread the love

विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर…

Loading

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?