Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा वर्धापन दिन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत उत्साहात साजरा
पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा वर्धापन दिन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत उत्साहात साजरा

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 15, 2026Updated:June 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आरोग्य शिक्षण, संशोधन व सेवाभावी कार्य अधिक बळकट करण्याचा संकल्प

पिंपरी, (हिंदवी न्यूज)– भारतीय वैद्यक शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, सुसूत्रता, पारदर्शकता आणि संशोधन संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि इतर आरोग्य विषयक अभ्यासक्रमांना एक सक्षम शैक्षणिक दिशा देण्याचे काम विद्यापीठाने केले आहे. आजच्या या विशेष दिनी आपण सर्वांनी वैद्यकीय शिक्षणातील उत्कृष्टता, नैतिक मूल्यांचे पालन, संशोधनवृत्तीचा विकास आणि सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प करूया, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेच्या प्रांगणात ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी आरोग्य शिक्षण, वैद्यकीय संशोधन आणि सेवाभावी आरोग्यसेवेची परंपरा अधिक बळकट करण्याचा संकल्प करण्यात आला.

या समारंभास अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण सोनी, डॉ. दिपाली अंबिके, डॉ. महेश असलकर, डॉ. तुषार पाटील, डॉ. शगुन पिसे, डॉ. दिनेश गाडेकर, डॉ. नचिकेत पळसकर, डॉ. रुपाली गौरी, डॉ. किशोर सुर्यवंशी, डॉ. रितेश पाठक, डॉ. निरंजन पाठक, डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. सीमा सोनी, डॉ. स्वाती मुडशिंकर, डॉ. सुर्यकांत मुनलोड, डॉ. कविता केळकर, डॉ. हर्षद गुजर, डॉ. नितीन मोकाशी तसेच पदव्युत्तर संस्थेत वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, आरोग्य क्षेत्रासाठी कुशल, प्रशिक्षित आणि सेवाभावी मनुष्यबळ घडविण्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली आहे. वैद्यकीय शिक्षण हे केवळ पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणापुरते मर्यादित नसून त्यामध्ये मानवी मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि रुग्णांविषयीची संवेदनशीलता यांचाही समावेश असणे आवश्यक आहे. आरोग्यसेवा ही समाजाप्रती असलेली एक मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाने आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी केला पाहिजे.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि पदव्युत्तर संस्था ही शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवा या त्रिसूत्रीवर कार्यरत आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनाला प्रोत्साहन आणि रुग्णकेंद्री सेवा या माध्यमातून संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रुग्णांना कमी खर्चात, दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने कार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी आजच्या या विशेष दिनी समाजाच्या आरोग्य उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत राहणे आणि आरोग्य क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करणे हीच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला खरी मानवंदना ठरेल, असेही डॉ. वाबळे यावेळी म्हणाले.

Loading

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article२२ हजार ९०६ मालमत्ता धारकांच्या शास्तीचे हाेणार समायाेजन
Next Article शाश्वत भविष्यासाठी ‘हरित शपथ’ अभियान
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

भाजपा शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 20260
Spread the love

विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर…

Loading

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?