Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»महापालिकेच्या आर.आर.आर. केंद्रांना नागरिकांची वाढती पसंती
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या आर.आर.आर. केंद्रांना नागरिकांची वाढती पसंती

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 20, 2026Updated:June 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

खेळणी, पुस्तके, कपडे व इलेक्ट्रॉनिक साहित्याचा पुनर्वापर

 पिंपरी, (हिंदवी न्यूज)- महापालिकेच्या‘आर.आर.आर. (रिड्यूस, रियूज, रिसायकल)’ संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या एका महिन्यात शहरातील विविध भागांतून ४५३ वस्तूंचे संकलन करण्यात आले आहे. या वस्तूंचे एकूण वजन ६२८.७५ किलो इतके असून, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळत आहे.

या उपक्रमांतर्गत नागरिकांनी घरातील वापरात नसलेल्या, मात्र पुनर्वापरयोग्य वस्तू स्वेच्छेने आर.आर.आर. केंद्रांवर जमा केल्या. यामध्ये खेळणी, पुस्तके, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच विविध घरगुती वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंचा पुनर्वापर होण्यास मदत होत असून, कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याबरोबरच नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनालाही हातभार लागत आहे.

आर.आर.आर. उपक्रमाच्या माध्यमातून ‘कमी वापरा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रण करा’ हा पर्यावरणपूरक संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे. या उपक्रमामुळे वस्तूंचा सुयोग्य वापर, पुनर्वापराची सवय आणि कचरा कमी करण्याबाबत जनजागृती होत असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभागही वाढत आहे. पर्यावरण संरक्षणासोबतच शाश्वत विकासाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, आर.आर.आर. उपक्रमाला नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा पर्यावरण संवर्धनाबाबतची त्यांची जागरूकता दर्शवितो. पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाला प्रोत्साहन देत कचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक आणि शाश्वत करण्यासाठी महापालिका सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. नागरिकांचा हा सहभाग स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी नागरिकांना शहरातील आर.आर.आर. केंद्रांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. घरातील वापरण्यायोग्य वस्तू या केंद्रांवर जमा करून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे.

 

💬पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण ही केवळ स्वच्छतेची संकल्पना नसून ती वसुंधरा संरक्षणाची प्रभावी चळवळ आहे. आर.आर.आर. उपक्रमामुळे वापरात नसलेल्या वस्तूंना नवे आयुष्य मिळत आहे आणि कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होत आहे. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून ‘कचऱ्यातून संसाधन’ निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ द्यावे. स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे.”

— रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका

…..

💬आर.आर.आर. केंद्रांद्वारे नागरिकांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वापरात नसलेल्या वस्तू टाकून देण्याऐवजी त्या गरजूंपर्यंत पोहोचविणे आणि पुनर्वापरासाठी देणे ही काळाची गरज आहे. अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ व शाश्वत शहर निर्मितीत योगदान द्यावे.

—डॉ. विजय सूर्यवंशी ,आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Loading

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमानधनावरील नर्सेसना न्याय देण्याची महापौर रवि लांडगे व स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची ग्वाही – कामगारनेते यशवंत भोसले 
Next Article सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन” हा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दिव्यांग कलाकार गायिका अबोली जरीत यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मान
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

भाजपा शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 20260
Spread the love

विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर…

Loading

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?