पुणे, (हिंदवी न्यूज)- विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या उबेद खान यास एनडीपीएसचे विशेष न्यायाधीश एस. आर. पवार यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याने ॲड. प्रणय महाजन यांमार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. खान याचा गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून त्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. तो वयाने लहान असून तो न्यायालयाने घालून दिलेल्या अटी शर्तींचे पालन करण्यात तयार असल्याचा युक्तिवाद सिनिअर ॲड. विपुल दुशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. प्रणय महाजन यांनी जमीन अर्जावर युक्तिवाद केला. त्यांना ॲड. रोहित राहिंज आणि ॲड. दीपक खेडकर यांनी सहकार्य केले.
न्यायालयाने तो ग्राह्य धरत जामीन मंजूर केला. एप्रिल 2026 रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
![]()
