Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»Pmrda»पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!
Pmrda

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

दोन्ही स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू; आयटी हब, व्यावसायिक संकुले आणि खाद्य-मनोरंजन केंद्रांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार!
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे 

पुणेरी मेट्रोच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिकेवरील प्रवाशांच्या सुविधेत आणखी भर पडली असून, बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन नवीन स्थानके बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजल्यापासून प्रवासी सेवेत दाखल झाली आहेत. या दोन्ही स्थानकांमुळे बालेवाडी, बाणेर व आसपासच्या परिसरातील नागरिकांना मेट्रोची सुविधा उपलब्ध होणार असून, पश्चिम पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

या दोन्ही स्थानकांना २४ नोव्हेंबर २०२६ रोजी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र आणि प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली. त्यानंतर ही स्थानके आज प्रवासी सेवेसाठी खुली करण्यात आली. या विशेष प्रसंगी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, महानगर मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी, मुख्य वित्त अधिकारी मितुल झवेरी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अन्य मान्यवर सहभागी झाले होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुण्यातील मेट्रोचे जाळे सध्या सुमारे ५५ किलोमीटरपर्यंत विस्तारले असून, आगामी काळात ते सुमारे १५० किलोमीटरपर्यंत नेण्याच्या दृष्टीने विविध मार्गांवर काम सुरू आहे. बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल होणे हा पुणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. आज मी स्वतः मेट्रोने प्रवास केला. हा अनुभव अतिशय सुखद होता. “प्रवासादरम्यान प्रवाशांशी संवाद साधला असता, त्यांनी मेट्रो सेवा आणि नव्या स्थानकांच्या प्रारंभाबद्दल समाधान व्यक्त केले. मेट्रो ही शहरांची जीवनवाहिनी बनत असून, पुणेकरांचा वाढता प्रतिसाद हे त्याचेच द्योतक आहे. “मेट्रो प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंतची जोडणी (लास्ट माईल कनेक्टिव्हिटी), वाहनतळ सुविधा आणि पीएमपीएमएल बससेवेशी समन्वय साधण्यावर भर दिला जात आहे. वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था प्रयत्नशील आहेत. तसेच मेट्रोची विमानतळाशी जोडणी करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. सविस्तर अभ्यासानंतर कल्याणीनगर-विमानतळ हा मार्ग अधिक योग्य असल्याचे समोर आले असून, त्या दृष्टीने पुढील कार्यवाही सुरू आहे.”

पीआयटीसीएमआरएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी म्हणाले, “बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल होणे हे मेट्रो मार्गिका ३ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या स्थानकांमुळे परिसरातील रहिवासी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि नियमित प्रवाशांना अधिक वेगवान, सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार मेट्रो सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध असून, अधिकाधिक नागरिकांनी दैनंदिन प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा स्वीकार करावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील.”

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, “मेट्रो मार्गिका ३ हा पीएमआरडीएच्या नियोजनबद्ध आणि शाश्वत शहरी विकासाच्या व्यापक दृष्टिकोनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाल्यामुळे या मार्गावरील सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता आणि सुलभता वाढणार आहे. शहराच्या सध्याच्या वाहतूकविषयक गरजा पूर्ण करण्यासोबतच भविष्यातील वाढत्या गरजांचाही विचार करून एकात्मिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्यावर आमचा भर आहे.”

बालेवाडी हायस्ट्रीट स्थानकामुळे पुण्यातील प्रमुख खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाच्या केंद्रांपैकी एक असलेल्या बालेवाडी हायस्ट्रीट येथे जाणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच परिसरातील आयटी कंपन्या, व्यावसायिक संकुले आणि कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही हे स्थानक सोयीचे ठरणार आहे. याशिवाय, बालेवाडी फाटा स्थानकामुळे बालेवाडी, बाणेर आणि लगतच्या परिसरातील रहिवासी तसेच नियमित प्रवाशांना मेट्रोची अधिक सुलभ सुविधा मिळणार आहे.

पुणे मेट्रो मार्गिका ३ ही २३.३ किलोमीटर लांबीची पूर्णपणे उन्नत मेट्रो मार्गिका असून, ती माण-हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान धावते. या मार्गावर एकूण २३ स्थानके आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या प्रकल्पाच्या उभारणी आणि संचालनाची जबाबदारी पीआयटीसीएमआरएलकडे सोपविली आहे. टाटा समूह आणि सीमेन्स यांची या कंपनीत संयुक्त भागीदारी आहे.

या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले होते. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून मेट्रो सेवेला प्रारंभ केला. यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि श्रीमती सुनेत्रा अजित पवार, मा.केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

pune-metro-line-3-balewadi-high-street-and-balewadi-phata-stations-open-for-passengers
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
Next Article महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे मेट्रो लाईन ३ प्रवाशांच्या पसंतीस; दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांच्या घरात

November 24, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबर टेकच्या “लिगसी”स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र

November 23, 2026

हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

November 19, 2026

चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

November 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड महापालिका

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 20260
Spread the love

पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश हिंदवी न्यूज…

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

November 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?